Join us
Daily Top 2Weekly Top 5

या सिनेमाने ऐश्वर्या रायला मिळवून दिली होती नवी ओळख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 10:02 IST

cnxoldfiles/a>. मात्र तिच्या अभिनयाची खरी झलक दिसली तिनं साकारलेल्या नंदिनीमध्ये...दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा हम दिल दे चुके सनम... ...

cnxoldfiles/a>. मात्र तिच्या अभिनयाची खरी झलक दिसली तिनं साकारलेल्या नंदिनीमध्ये...दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा हम दिल दे चुके सनम... 1999 साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या या सिनेमानं ऐश्वर्या रायला नवी ओळख मिळवून दिली...'हम दिल दे चुके सनम'च्या या नंदिनीनं ऐश्वर्या फक्त एक शोभेची बाहुली अशी टीका करणा-यांची तोंडं कायमची बंद करुन टाकली… प्रियकरावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याच्यासाठी नव-याला सोडून सातासमुद्रापार जाण्याची तयारी असलेली या नंदिनीनं रसिकांवर जादू केली... सिनेमात ऐश्वर्याच्या अभिनय कौशल्यासोबतच डान्सचंही तितकंच कौतुक झालं...या सिनेमानं रसिकांवर जादू केली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं...'हम दिल दे चुके सनम'च्या यशानंतर सुभाष घईंच्या ताल सिनेमात ऐश्वर्या झळकली...या सिनेमात ऐश्वर्यानं साकारलेली मानसी ही प्रेयसी आणि गायिका भाव खाऊन गेली...'हम दिल दे चुके सनम' आणि 'ताल'च्या यशानंतर ऐश त्या काळातली बिझी एक्ट्रेस बनली.. ऐशचे एकामागून एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकत होते.. 'जोश' सिनेमात ऐशनं किंग खान शाहरुखच्या जुळ्या बहिणीची भूमिका साकारली.. मात्र जोशचा जोश बॉक्सऑफिसवर काही राहिला नाही..त्यानंतर 'हमारा दिल आपके पास है', 'ढाई अक्षर प्रेम के', 'अलबेला' अशा सिनेमातून ती रुपेरी पडद्यावर झळकली... ऐश्वर्या सिनेमात असल्याने प्रत्येक सिनेमाची चर्चा झाली खरी मात्र कथेत दम नसल्याने रसिकराजाने सिनेमांना साफ नाकारलं...फ्लॉप 'ढाई अक्षर प्रेम के' नंतर ऐशनं आदित्य चोप्राच्या 'मोहब्बते' या रोमँटिक सिनेमात मेघा शंकर ही भूमिका साकारली.. बिग बी अमिताभ आणि किंग खान शाहरुखची जुगलबंदी मोहब्बतेचं आकर्षण असलं तरी छोट्याशा भूमिकेला ऐशनं न्याय दिला.. त्यासाठी तिला फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं...   यशा-अपयशाच्या वाटेवर बॉक्स ऑफिसवर एंट्री मारली ती पारोनं....संजय लीला भन्सालीचा आणखी एक मेगा प्रोजेक्ट म्हणजे देवदास... देवदास-पारो आणि चंद्रमुखीच्या प्रेमाचा त्रिकोण... यांत ऐश्वर्याने साकारली पारो...सिनेमात शाहरुख-माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रायच्या अभिनयाची ट्रीट रसिकांना मिळाली.. असं असलं तरी सा-यांना भावली पारो आणि चंद्रमुखीची ऑनस्क्रीन जुगलबंदी... देवदासला राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय पातळीवर कौतुक आणि कमाई केली... मात्र यांत सगळ्यात जास्त स्तुती झाली ती ऐश्वर्याची... सौंदर्यासह एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर असल्याचं ऐशनं सिद्ध केल्याचं मत आतंरराष्ट्रीय क्रिटिक्सनी नोंदवलं...देवदासनंतर ऐशनं भाऊ आदित्य रायची पहिलीवहिली निर्मिती असलेल्या दिल का रिश्ता आणिं कुछ ना कहो सिनेमात काम केलं.. मात्र दोन्ही सिनेमा कधी आले आणि गेले तेही कुणाला कळलं नाही... बॉलिवूडसोबतच इतर भाषांमध्येही ऐशच्या अभिनयाने रसिकांवर जादू केली... मग ते दाक्षिणात्य सिनेमा असो किंवा मग बंगाली.... किंगा मग थेट हॉलीवुड सिनेमा...देवदासनंतर ऐशनं चोखेर बाली हा बंगाली आणि ब्राईड एंड प्रेज्युडिस या हॉलीवुडपटातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली...बॉलिवूड आणि अफेअर हे काही जणू समीकरणच... मग त्याला सौंदर्याची मल्लिका ऐश तरी कशी अपवाद राहिल...'हम दिल दे चुके सनम'मध्ये नंदिनी आणि समीरचा ऑन स्क्रीन रोमान्स सुरु असताना ऑफ स्क्रीनही दोन हृदय एकमेंकामध्ये गुंतले होते... ते म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय...दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा त्या काळी रंगल्या होत्या.. दोघांनी कधीही होकार किंवा नकार दिला नाही... मात्र 2001 साली दोघांच्या प्रेमकहाणीत आलं मोठं वादळ... सलमान खाननं मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं ऐश्वर्याचं कथित विधान एका इंग्रजी दैनिकानं छापलं... त्यानंतर दोघांच्याही नात्यात कायमचा दुरावा आला...त्याच दरम्यान क्यों हो गया नाच्या सेटवर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉयमध्ये जवळीक वाढत असल्याच्याही वावड्या उठल्या... त्यामुळंच विवेक आणि सलमानमध्ये कोल्ड वॉरच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या.