'फन्ने खां'नंतर या चित्रपटात काम करणार ऐश्वर्या राय बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 10:55 IST
ऐश्वर्या राय बच्चनच्या 'ए दिल है मुश्कील'चित्रपटानंतर लवकरच ती 'फन्ने खां'मध्ये दिसणार आहे. ऐश्वर्या बरोबर या चित्रपटात अनिल कपूर, ...
'फन्ने खां'नंतर या चित्रपटात काम करणार ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या राय बच्चनच्या 'ए दिल है मुश्कील'चित्रपटानंतर लवकरच ती 'फन्ने खां'मध्ये दिसणार आहे. ऐश्वर्या बरोबर या चित्रपटात अनिल कपूर, राजकुमार राव आणि दिव्या दत्ता हे देखील कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार ऐश्वर्या राय बच्चन 'फन्ने खां'नंतर 'रात और दिन' आणि 'वो कौन थी'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.'ऐश्वर्या राय बच्चन'ने या बातमीला दुजोरा दिला आहे. ऐशने एका फॅशन मॉग्झिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,''रात और दिन' साठी मला विचारण्यात आले आहे.'' ती पुढे म्हणाली, ह्या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळते आहे हे फार चांगले आहे आणि संजय दत्तची पण हीच इच्छा आहे की ही भूमिका मीच करावी. संजय दत्ता म्हणाले की, माझी इच्छा आहे की तू ही भूमिका करावी त्याचे बोलणे माझ्या मनाला भावले. सध्या या चित्रपटावर काम चालू आहे." या चित्रपटासाठी नरगिस यांना नॅशनल अॅवॉर्डनेसुद्धा सम्मानित करण्यात आले होते. चित्रपटात कथा एका अशा महिले भवती फिरते जिला मल्टी पर्सनॉलिटी डिसऑर्डरचा आजार असतो.सत्येन बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रदीप कुमार, नर्गिस आणि फिरोज खान यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. ऐश्वर्याने पुढे असे ही सांगितले की तिला चित्रपट "वो कौन थी" साठी सुद्धा विचारण्यात आले होते. ऐश 'फन्ने खां' चित्रपटाबाबत बोलताना म्हणाली की,''फन्ने खां' मध्ये मी साधी सरळ भूमिका करत आहे. जी लहान सहान गोष्टीवर सुद्धा पटकन विश्वास ठेवते." हा एक क म्युझिकल कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत.‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे.