Join us

ट्रोलर्सने तर आराध्यालाही सोडले नाही, ऐश्वर्यासोबत दिसताच पुन्हा केले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 11:19 IST

आराध्याला घेवून ऐश्वर्याला ट्रोल करणे ही काय पहिलीच वेळ नाही याआधीही तिला याच कारणामुळे ट्रोल केले गेले आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. बच्चन सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं जातं. महानायक बिग बी अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यामुळे बच्चन कुटुंब कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतं. बच्चन कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा आपसुकच होते. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात.

गेल्या काही दिवसांपासून स्टारकिडसचाच सोशल मीडियावर जास्त बोलबाला असल्याचे पाहायला मिळते. सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिड सैफ आणि करिनाचा लाडला तैमुर आहे. त्यानंतर ऐश्वर्याची लेक आराध्यादेखील इतर स्टार किडप्रमाणे चर्चेत असते. बऱ्याचदा आराध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत येते. ती ऐश्वर्याची कार्बन कॉपी असल्याचं नेहमी बोललं जातं आणि त्यांची तुलनादेखील केली जाते.

मात्र सध्या ट्रोलिंग करण्याचा प्रकारही घडत आहे. प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते याचे भानच सध्या ट्रोलर्स विसरत चालल्याचे चित्र आहे.  गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबियांच्या प्रत्येक व्यक्तींवर टीका टीप्पणी करताना ट्रोलर्स दिसतात.

 

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीलाही ट्रोल केेले गेले त्यानंतर तिची आई श्वेता बच्चनवरही निशाणा साधला आणि आता आराध्या बच्चनमुळे ऐश्वर्या राय बच्चनलाही ट्रोल केले जात आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन नेटीझन्स ऐश्वर्याच्या फोटोंवर कमेंटस करताना दिसत आहे. 

ऐश्वर्या मुलीची एवढी काळजी करणं आवडत नाही. त्यामुळे तिला नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. आताही ऐश्वया आराध्यासोबत एअरपोर्टवर दिसली ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ऐश्वर्याला पुन्हा ट्रोल केलं जात आहे. आराध्याला घेवून ऐश्वर्याला ट्रोल करणे ही काय पहिलीच वेळ नाही याआधीही तिला याच कारणामुळे ट्रोल केले गेले आहे. 

ऐश्वर्याला आराध्यासोबत काम करण्याबाबत विचारले असता तिने सांगितलं की, मला माहित नाही की मी व माझ्या मुलीच्या बाबतीत जीवनात काय लिहिलेलं आहे. आम्ही प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि एकत्र काम करण्याची गोष्ट ते पुढे पाहता येईल.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन