Join us

बाळाच्या जन्मानंतर ऐश्वर्या राय बच्चन, काजोल, शिल्पा शेट्टी, लारा दत्ता, मलाईका अरोरा खान, जेनेलिया डिसूजा देशमुख ‘या’ अभिनेत्री पुन्हा परतल्या त्यांच्या ग्लॅमरस अवतारात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:54 IST

आई होण्यासारखा दुसरा कुठलाही मोठा आनंद नाही. तुमचं तान्हुलं बाळ तुमच्या कुशीत पहुडलेलं पाहणं, यातचं जगातलं सगळं सुख आहे. ...

आई होण्यासारखा दुसरा कुठलाही मोठा आनंद नाही. तुमचं तान्हुलं बाळ तुमच्या कुशीत पहुडलेलं पाहणं, यातचं जगातलं सगळं सुख आहे. प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यात याचा अनुभव घेते. बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रीदेखील याला अपवाद नाहीत. करिनाने आजच एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर करिना लगेच कामावर परतणार आहे. प्रेग्नंसीदरम्यानची करिनाची स्टाईल चर्चेचा विषय ठरली होती. आता बाळाच्या जन्मानंतर करिनाचा लूक कसा असेल, हे पाहणे रोचक ठरणार आहे. प्रसूतीनंतर सर्वात आधी करिनाला तिच्या परफेक्ट शेपमध्ये परतावे लागणार आहे. करिनाआधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनीही हेच केले. त्यावर एक नजरऐश्वर्या राय बच्चनऐश्वर्या राय बच्चन म्हणजे जगातील सर्वांत सुंदर स्त्री. ऐश्वर्याची मुलगी आराध्या आता पाच वर्षांची झाली आहे. आराध्याच्या वेळी ऐश्वर्या गर्भवती राहिली आणि स्वाभाविकपणे तिचे वजन वाढले. इतके की, तिच्या यावरून तिची टिंगल-टवाळकीही झाली. पण ऐश्वर्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. इतकेच नाही तर आराध्याला जन्म दिल्यानंतरही वजन कमी करण्यासाठी तिने अजिबात घाई केली नाही. ग्लॅमर टिकवण्यापेक्षा माझ्या बाळाची आई म्हणून जगणे मला अधिक महत्त्वाचे वाटतेय, असे सांगून तिने टिकाकारांची तोंड बंद केली. अर्थात यानंतर हळूहळू ऐश्वर्या पुन्हा तिच्या ग्लॅम लूकमध्ये परतली. यावर्षीच्या कान्समधील तिचा हॉट अ‍ॅण्ड सेक्सी लूक पाहून तिच्या वाढत्या वजनावर टीका करणाºयांनी अक्षरश: तोंडात बोटं घातली.काजोलकाजोल म्हणजे बॉलिवूडची गुणी अभिनेत्री. दोन मुलांची आई असूनही काजोलचा चार्म जराही कमी झालेला नाही. खरे तर काजोल कधीच स्लीम नव्हती. लोकांनी आपल्याला स्लीम, सेक्सी म्हणाव, असे काजोलला कधीच वाटले नाही. वाढत्या वजनाबद्दल त्यामुळेच ती बेपर्वा दिसली. पण दोन्ही मुलांच्या जन्मानंतर काजोलने बरेच वजन कमी केले. यानंतर गेल्या वर्षभरातील काजोलने असा काही मेकओवर केला की, ती दोन मुलांची आई आहे, हे सांगूनही पटणार नाही.शिल्पा शेट्टीशिल्पा शेट्टी कायम तिच्या फिगरबद्दल जागृत राहिलीय. अगदी बॉलिवूडमध्ये आली तेव्हापासून शिल्पाने स्वत:ला कधीच बेडौल होऊ दिले नाही. अर्थात प्रेग्नंसीच्या काळात नैसर्गिकरित्या तिचे वजन वाढले. पण मुलाच्या जन्मानंतर अगदी महिनाभरात शिल्पा तिच्या नेहमीच्या सुडौल बांध्यासह परतली. नियमित योगाभ्यासह शिल्पाने नव्याने तिचा ग्लॅमरस लूक मिळवला.लारा दत्तालारा दत्ता बॉलिवूडमध्ये फारसी सक्रिय नाही. पण प्रेग्नंसीपूर्वी बॉलिवूडमध्ये लाराचा बराच जलवा होता. प्रेग्नंसीच्या काळात लाराचे बरेच वजन वाढले. पण तरिही ती अनेक पार्ट्यांमध्ये दिसली. प्रसूतीनंतर मात्र लाराने लगेच वाढलेले वजन कमी केले आणि चेहºयावर एखाद्या स्कूलगर्लसारखा चार्म घेऊन परतली.मलाईका अरोरा खानअरबाज खानपासून विभक्त झालेली मलाईका अरोरा ओळखली जाते ते तिच्या ग्लॅमरस अवतारासाठी. प्रेग्नंसीकाळात मलाईकाचेही वजन वाढले. पण त्याची तिने जराही तमा बाळगली नाही. अगदीआपल्या बेबीबम्पसह ती रॅम्पवरही दिसली. पण  प्रसूतीनंतर मलाईका लगेच तिच्या सेक्सी लूकमध्ये परतली.सध्याचे मलाईकाचे लूक पाहिल्यावर तर ती आई आहे, हेच पटत नाही.जेनेलिया डिसूजा देशमुखरितेश देशमुखची गोड हसरी बायको म्हणजे जेनेलिया. जेनेलिया आज दोन मुलांची आई आहे. पहिला मुलगा उणापुरा वर्षभराचा होण्यापूर्वी जेनेलिया दुसºयांदा पे्रेग्नंट राहिली. या काळात तिचे वजन प्रचंड वाढले. पण आताश: दोन मुलांच्या जन्मानंतर जेनेलिया पुन्हा तिच्या परफेक्ट शेपमध्ये परतली आहे.