Join us

​ मीडियाने केले असे काही की, ऐश्वर्या राय बच्चनच्या डोळ्यात दाटले अश्रू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 15:02 IST

मुलांसोबत केक कापून ऐश्वर्याने वडिलांचा वाढदिवस साजरा केला. पण तत्पूर्वी असे काही झाले की, ऐश्वर्याचे डोळे पाणावले.

कालचा दिवस ऐश्वर्या राय बच्चनसाठी खास दिवस होता. काल तिचे वडिल कृष्णराज राय यांचा वाढदिवस होता. (कृष्णराज राय आज हयात नाहीत. याचवर्षी मार्चमध्ये त्यांचे निधन झाले. ) स्माईल्स ट्रेन फाऊंडेशनच्या मुलांसोबत ऐश्वर्याने वडिलांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी ऐश्वर्याने १०० मुलांच्या शस्त्रक्रियेचा खर्च करण्याची घोषणा केली. या इव्हेंटला ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चन आणि आई वृंदा राय या दोघीही तिच्यासोबत होत्या.  मुलांसोबत केक कापून ऐश्वर्याने वडिलांचा वाढदिवस साजरा केला. पण तत्पूर्वी असे काही झाले की, ऐश्वर्याचे डोळे पाणावले. होय, ऐश्वर्या राय आराध्यासोबत या इव्हेंटमध्ये पोहोचली आणि तिथून मीडियाने तिचा पिच्छा पुरवणे सुरु केले. इव्हेंटमध्येही मीडियाची क्लिक क्लिक सुरु होती. काही मिनिटांतच मीडियाचा गोंधळ इतका वाढला की, इव्हेंटमधील लहान मुले रडायला लागली. हे पाहून ऐश्वर्याने फोटोग्राफर्सला फोटो काढणे थांबवायचे बजावले. पण फोटोग्राफर्स जुमानले नाहीत. मीडियाच्या या अरेरावीमुळे ऐश्वर्या इतकी भावूक झाली की, तिचे डोळे पाणावले. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले. ऐशला रडताना पाहून आराध्याही हिरमुसली. अखेर तिने आईला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिने आईकडे केक कापण्यासाठी चाकू समोर केला आणि आराध्याचा हा संजसपणा पाहून ऐश्वर्या स्वत:ला कसेबसे सांभाळले. खरे तर वडिलांचा वाढदिवस असल्याने तशीही ऐश्वर्या इमोशनल होती. पण मीडियाने ऐश्वर्याला आणखीच इमोशनल केले.  कृष्णराज राय कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. ALSO READ : असा साजरा झाला बच्चन कुटुंबाची ‘प्रिन्सेस’ आराध्याचा वाढदिवस!यापूर्वीही मनीष मल्होत्राच्या पार्टीत फोटोग्राफर्सनी चुकीच्या अँगलने ऐश्वर्याचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चन तिच्यासोबत होता. त्याने हे बघितले आणि लगेच संबंधित फोटोग्राफर्सला हे फोटो डिलिट करण्यास सांगितले होते. सध्या ऐश्वर्या राय ‘फन्ने खान’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.