Join us  

श्वेता बच्चन-नंदाला बिग बींचा बंगला मिळाला; नेटिझनने रचले इमले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:48 AM

Aishwarya-abhishesk bachchan: अमिताभ बच्चन यांनी त्यांचा प्रतीक्षा हा प्रशस्त बंगला श्वेता बच्चन-नंदाच्या नावावर केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी प्रॉपर्टी, कुटुंब वाद या चर्चेला सुरूवात केली.

बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अमिताभ बच्चन (amitabh bachchan)  सध्या त्यांच्या दोन मुलांमुळे म्हणजेच श्वेता बच्चन-नंदा ( shweta bachchan) आणि अभिषेक बच्चन (abhishesk bachchan) यांच्यामुळे चर्चेत येत आहे. बिग बींच्या अमाप संपत्तीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे या संपत्तीचा मूळ वारसदार कोण होणार, या संपत्तीचा मोठा वाटा कोणाच्या पदरात पडणार असे प्रश्न अनेकांना पडले होते. यामध्येच अमिताभ यांनी त्यांचा प्रतीक्षा हा प्रशस्त बंगला श्वेताच्या नावावर केला. त्यामुळे बिग बींनी त्यांच्या संपत्तीची वाटणी सुरु केली की काय? हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकंच नाही तर आता हा बंगला श्वेताला मिळाल्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या (aishwarya rai) नात्याबद्दल नेटकऱ्यांनी इमले बांधायला सुरुवात केली.

अमिताभ यांनी त्यांचं पहिलं घर प्रतीक्षा हा बंगला श्वेताच्या नावावर केला. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ८ नोव्हेंबर रोजी त्यांनी ते श्वेता बच्चनला एका कराराद्वारे सुपूर्द केले. यासाठी अमिताभ बच्चन यांनी ५०.६५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. हा बंगला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी एकत्र भेट म्हणून दिला आहे. या बंगल्याची किंमत ५० कोटी ६३ लाख रुपये इतकी आहे.

श्वेताला घर मिळताच नेटकऱ्यांनी लावले तर्कवितर्क

अमिताभ यांनी श्वेताला प्रतीक्षा गिफ्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याचे इमले रचले. इतकंच नाही तर बिग बींच्या या निर्णयामुळे ऐश्वर्या नाराज झाली आहे असंही म्हटलं गेले. बिग बींनी श्वेताच्या नावे इतकी मोठी संपत्ती केल्यानंतर ऐश्वर्यानेही संपत्तीसाठी नवा डाव टाकल्याचं नेटकरी म्हणत आहेत. अभिषेकला घटस्फोट देऊन त्याच्याकडून मोठ्या स्वरुपात पोटगी घेता यावी यासाठी ऐश्वर्या हे सगळं करत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर, काही नेटकऱ्यांनी तिला पाठिंबाही दिला आहे. ऐश्वर्या संपत्तीसाठी असं कधीच करणार नाही, असं म्हणत तिच्या चाहत्यांनी तिची पाठराखण केली आहे.

दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात मतभेद सुरु असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी इव्हेंटमध्ये एकत्र येत या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम लावले आहेत.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनअमिताभ बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूड