Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आराध्याला दूर ठेऊ इच्छित नाही ऐश्वर्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:59 IST

ऐश्वर्या राय बच्चन आपली मुलगी आराध्यला एकाही मिनिटांसाठी दूर ठेऊ इच्छित नाही असेच म्हणावे लागेल. यामागचे कारणही तसेच आहे. ...

ऐश्वर्या राय बच्चन आपली मुलगी आराध्यला एकाही मिनिटांसाठी दूर ठेऊ इच्छित नाही असेच म्हणावे लागेल. यामागचे कारणही तसेच आहे. नवरात्रीनिमित्त बच्चन कुुटुंबियांनी दुर्गापूजेसाठी हजेरी लावली होती. यावेळी एकाही मिनिटांसाठी ऐश्वर्याने आराध्याला आपल्यापासून दूर केले नाही. पूर्ण वेळ ती एश्वर्याच्या कुशीत बसून होती. बच्चन कुटुंबिय धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावताना आपण सर्वांनिच पाहिले आहे. दुर्गापूजेसाठी बच्चन कुुटुंबियांनी मुंबईच्या दुर्गापूजा मंडळात उपस्थिती लावली. यावेळी अमिताभसह पत्नी जया, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या, नातीन आराध्यासह मुलगी श्वेता यांनी हजेरी लावली. संपूर्ण बच्चन कुुटुंबिय पारंपारिक ड्रेसमध्ये दिसले. नुकतीच ऐश्वर्या राय बच्चनने ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. शूटिंगच्या निमित्ताने बाहेर असलेल्या ऐश्वर्याला आराध्यासाठी वेळ काढणे कठीण जात असावे. कामातून वेळ मिळाल्यावर आराध्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा अशी तिची इच्छा असणे स्वाभाविक आहे. अशावेळी जर संपूर्ण कुुटुंबियाला बाहेर जायचे असेल तर आराध्याची संपूर्ण जबाबदारी ऐश्वर्याच सांभाळताना दिसत आहे. बच्चन कुुटुंबियांचा हा फोटो पाहिल्यावर याची कल्पना तुम्ही करू शकता. यापूर्वी देखील बच्चन कुुुटुंबियांच्या फोटोमध्ये आराध्या आपल्या आईजवळ आनंदी असल्याची दिसते.