Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेकने सांगितले- तो आणि अमिताभ बच्चन कधीपर्यंत हॉस्पिटलमध्ये राहतील, ऐश्वर्या आणि आराध्याचीही दिली अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 11:36 IST

याआधी अमिताभ बच्चन यांना श्वास घेण्यात त्रास होत होता.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चननंतर ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चनदेखील कोरोना पॉझिटीव्ह आल्या आहेत. तर जया बच्चम यांची कोरोना टेस्ट नेगेटीव्ह आली आहे. आराध्य आणि ऐश्वर्या घरीच आहेत अशी माहिती अभिषेक बच्चनने ट्विटरवरुन दिली. 

अभिषेकने ट्विट केले की, ऐश्वर्या आणि आराध्याचा रिपोर्टदेखील कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. दोघी होम क्वॉरांटाईन आहे. घरातील इतर सदस्य आणि आईचा रिपोर्ट नेगेटीव्ह आला आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद.

यानंतर अभिषेकने आणखी एक ट्विट केले,  डॉक्टर सांगतील तोपर्यंत मी आणि माझे वडील रुग्णालयात राहू. तुम्ही सर्वानी स्वतःची काळजी घ्या आणि सर्व नियम पाळा.'

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पूर्वीपेक्षा अमिताभ बच्चन यांची प्रकृती आता चांगली आहे. याआधी अमिताभ बच्चन यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. बच्चन यांना कोरोना झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत. अनेक संकटांना पुुरुन उरणारे महानायक हे आतादेखील कोरोनाला हरवतील असा त्यांचा विश्वास आहे. अमिताभ बच्चन व बच्चन परिवारातील सदस्य हे कोरोनातून लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे फॅन्स देवाकडे प्रार्थना करत आहेत. 

टॅग्स :अभिषेक बच्चनकोरोना वायरस बातम्याअमिताभ बच्चन