सेलिब्रिटी असण्याचे फायदे आणि तोटे आहेत. पब्लिक फिगर असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होते. काही स्टार्स यावर गप्प राहतात, परंतु काही असे आहेत जे याबद्दल आपले मत व्यक्त करतात. अलीकडेच रवीना टंडन(Raveena Tandon)ने गोपनीयतेचे उल्लंघन करणाऱ्या एअरहोस्टेसलाही फटकारले आहे. खरेतर, रवीना टंडननेश्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राहुल मोदी (Rahul Modi) यांना फ्लाइटमध्ये गुपचूप शूट करणाऱ्या एअर होस्टेसला चांगलेच सुनावले आहे. अलीकडेच, श्रद्धा आणि राहुल हे कपल फ्लाइटमध्ये दिसल्याचे बोलले जात होते. त्यांचा व्हिडीओ एका एअरहोस्टेसने गुपचूपपणे शूट केला होता.
व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र बसलेले दिसत आहेत. यादरम्यान, अभिनेत्री तिचा कथित बॉयफ्रेंड राहुलला फोनवर काहीतरी दाखवताना दिसतेय. दोघांनाही माहित नव्हते की कोणीतरी त्यांचे शूटिंग करत आहे. इंडिया फोरम्सने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये रवीना टंडनने प्रतिक्रिया दिली आहे.
रवीना टंडन संतापलीरवीना टंडनने श्रद्धा कपूर आणि राहुल यांचा गुपचूप व्हिडीओ शूटिंग केल्याबद्दल फटकारले आहे. अभिनेत्री म्हणाली, "हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. हे करण्यापूर्वी क्रू मेंबर्सना हे चांगले माहित असले पाहिजे की त्यांची संमती घ्यावी लागते. क्रू मेंबर्सकडून असे करण्याची अपेक्षा नाही."
राहुल-श्रद्धा २ वर्षांपासून करताहेत डेटिंगराहुल मोदी आणि श्रद्धा कपूर डेटिंग करत असल्याच्या बातम्या गेल्या २ वर्षांपासून येत आहेत. जरी दोघांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृत केलेले नाही, परंतु दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. तसेच श्रद्धा राहुलसाठी पोस्ट करत असते. यामुळे ते डेटिंग करत आहेत असं म्हटलं जात आहे. अलीकडेच श्रद्धाने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ती एक डान्स करत होती आणि राहुल तिचा व्हिडीओ बनवत होता. राहुल 'तू झुठी मैं मक्कार'चा लेखक होता.