Join us  

तारा सुतारियासोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार हा स्टारकिड, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा आहे मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 6:00 AM

निमार्ता साजिद नाडियादवाला त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे

दिग्दर्शक मिलन लूथरिया आपला आगामी सिनेमा तडपचे शूटिंग उत्तराखंडमध्ये करतोय. तडपचे 90 टक्के शूटिंग उत्तराखंडमध्ये होणार आहे. देहरादून, मसूरी, ऋषिकेश आणि हर्षिलमध्ये शूट केले जाणार आहे. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. 

या सिनेमात  अहानसोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. उत्तराखंडच्या कलाकारांनाही या सिनेमात संधी देण्यात येणार आहे.  अहान 2018मध्ये आलेल्या 'आरएक्स 100' या तमिळ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे.   

निमार्ता साजिद नाडियादवाला अहानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. मिलन लुथरियाने आत्तापर्यंत वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई , द डर्टी पिक्चर , बादशाहो यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. अहान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन देखील चर्चेत आहे. अहान आणि तनिया अनेकदा एकमेकांसोबत दिसले. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. पण दोघांनीही या नात्याबद्दल बोलणे टाळले. पण आता अहानने स्वत:चं या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

अहानच्या आधी त्याची बहीण अथिया शेट्टी हिने २०१५ मध्ये बॉलिवूड डेब्यू केला होता. सलमान खान निर्मित ‘हिरो’मधून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटात अथिया सूरज पांचोलीसोबत दिसली होती. पण हा चित्रपट दणकून आपटला होता. अथिया व सूरजची जोडी प्रेक्षकांना आवडली नव्हती. अथियानंतर अहान आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. आता त्याचा डेब्यू किती यशस्वी होतो, ते बघूच.

टॅग्स :अहान शेट्टीतारा सुतारिया