Join us

​पुन्हा ‘या’ खानने ‘सिंघम’शी घेतला ‘पंगा’! असे केले tweet की, अजय देवगणचा होणार तिळपापड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 12:06 IST

केआरके अर्थात कमाल आर खान याला कोण ओळखत नाही? खरे तर लोकांनी ओळखावे, असे केआरकेने काहीही केलेले नाही. पण ...

केआरके अर्थात कमाल आर खान याला कोण ओळखत नाही? खरे तर लोकांनी ओळखावे, असे केआरकेने काहीही केलेले नाही. पण ‘बिग बॉस’शोमध्ये आला अन् केआरकेला लोक ओळखू लागले. यानंतर केआरकेने TWITTERवर बॉलिवूड स्टार्सला टार्गेट करून चर्चेत राहण्याचे प्रयत्न केलेत. त्यांच्या या प्रयत्नांना नाही म्हणता, म्हणता चांगलेच यश आले आणि त्यामुळेच चर्चेत राहण्याचा हा फंडा आजही केआरके वापरताना दिसतोयं. केआरकेने आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांची पंगा घेतलाय. पण गतवर्षी अजय देवगणसोबत पंगा घेणे त्याला चांगलेच भारी पडले होते. गतवर्षी करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि अजयचा ‘शिवाय’च्या बॉक्सआॅफिस संघर्षादरम्यान  अजय व केआरके यांच्यात वाजले होते. अजयने केआरकेचा पर्दाफाश करत, त्याचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर प्रचंड खळबळ माजली होती. अर्थात तरिही केआरकेचे उपद्व्याप थांबवले नाहीत. कारण यापश्च्यात पुढे अनेकवेळा केआरकेने अजयला लक्ष्य केले होते. आता अजयचा ‘बादशाहो’ हा चित्रपट रिलीजच्या तयारीत असताना, केआरकेने पुन्हा एकदा खोडसाळपणा केला आहे. होय, ‘मी कधीही चित्रपट बनवलाच तर त्यात कुठल्याही जुन्या हिट गाण्याचे रिमिक्स व्हर्जन वापरणार नाही. कारण मी ‘चू....’  दिग्दर्शक नाही,’असे tweet केआरकेने केले आहे.या tweetमध्ये केआरकेने कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण त्याचा इशारा अजय देवगणवर होता, हे स्पष्ट आहे. कारण अजयच्या ‘बादशाहो’ या चित्रपटात ‘मेरे रश्के कमर’ आणि ‘सोचा है...’ या जुन्या हिट गाण्यांचा रिमेक आहे. आता यावर अजय कसा रिअ‍ॅक्ट होतो, ते बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.