ALSO READ : इशा गुप्ताच्या या सात फोटोंनी ओलांडल्या बोल्डनेसच्या परिसीमा!!
अगदी अलीकडे इशाने आपले टू पीसमधील अतिशय बोल्ड फोटो शेअर केले होते. या फोटोंवरून इशा चांगलीच ट्रोल झाली होती. सोशल साईटवर अनेक युजर्सनी इशाच्या या फोटोंवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘क्या आपके पापाने इन तस्वीरों को देखा है?’इथपर्यंत युजर्सने इशाला विचारून टाकले होते. पण युजर्सच्या या संतापाचा इशावर कुठलाच परिणाम झाला नाही. कारण यानंतर एकापाठोपाठ एक असे त्याहीपेक्षा बोल्ड असे दोन फोटो शेअर करून तिने सगळ्यांना अवाक केले होते. आत्ताचा तिचा ताजा फोटोही त्यातलाच.
अर्थात या फोटोंवरून इशाला ट्रोल होण्याचा धोका नाही. कारण या फोटोंला युजर्स केवळ लाईक करू शकणार आहेत. कारण इशाने या फोटोंवर एन्ट्री बंद केली आहे. म्हणजेच युजर्स या फोटोंवर कमेंट्स करू शकणार नाही. लवकरच इशा मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘बादशाहो’ या चित्रपटात दिसणार आहे. यात इशाचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.