Join us

​दोन आठवड्यानंतर इशा गुप्ताने पुन्हा शेअर केला अतिशय बोल्ड फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 10:07 IST

बॉलिवूडमध्ये आपल्या हॉट अदांसाठी ओळखली जाणारी इशा गुप्ता सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.  स्वत:चे हॉट अन् बोल्ड फोटो ...

बॉलिवूडमध्ये आपल्या हॉट अदांसाठी ओळखली जाणारी इशा गुप्ता सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.  स्वत:चे हॉट अन् बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचा सपाटाच जणू तिने लावला आहे. कधी टॉपलेस तर कधी न्यूड फोटो शेअर करून इशाने इंटरनेटवर आग लावली आहे. आता आणखी एक असाच हॉट फोटो शेअर करून इशाने या आगीत तेल ओतल आहे.स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोत इशाने डेनिम जॅकेट कॅरी केले आहे. सध्या इशाचा हा फोटो वेगाने व्हायरल होतो आहे.ALSO READ : इशा गुप्ताच्या या सात फोटोंनी ओलांडल्या बोल्डनेसच्या परिसीमा!!अगदी अलीकडे इशाने आपले टू पीसमधील अतिशय बोल्ड फोटो शेअर केले होते.  या फोटोंवरून इशा चांगलीच ट्रोल झाली होती. सोशल साईटवर अनेक युजर्सनी इशाच्या या फोटोंवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘क्या आपके पापाने इन तस्वीरों को देखा है?’इथपर्यंत युजर्सने इशाला विचारून टाकले होते. पण युजर्सच्या या संतापाचा इशावर कुठलाच परिणाम झाला नाही. कारण यानंतर एकापाठोपाठ एक असे त्याहीपेक्षा बोल्ड असे दोन फोटो शेअर करून तिने सगळ्यांना अवाक केले होते. आत्ताचा तिचा ताजा फोटोही त्यातलाच.   अर्थात  या फोटोंवरून इशाला ट्रोल होण्याचा धोका नाही. कारण या फोटोंला युजर्स केवळ लाईक करू शकणार आहेत. कारण इशाने या फोटोंवर एन्ट्री बंद केली आहे. म्हणजेच युजर्स या फोटोंवर कमेंट्स करू शकणार नाही. लवकरच इशा मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘बादशाहो’ या चित्रपटात दिसणार आहे. यात इशाचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.