Join us

​दहा वर्षानंतर करिना कपूरने केले बिकनी फोटोशूट...फोटो पाहून व्हाल दंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 14:02 IST

आई बनल्यानंतर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाद्वारे कमबॅक करण्यासाठी सज्ज असलेली करिना कपूर सध्या चर्चेत आहे. होय, तिचे काही ...

आई बनल्यानंतर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाद्वारे कमबॅक करण्यासाठी सज्ज असलेली करिना कपूर सध्या चर्चेत आहे. होय, तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वोग मॅगझिनच्या इंडिया एडिशनसाठी करिनाने केलेल्या फोटोशूटचे हे फोटो आहेत आणि यातून एक वेगळीच करिना दीर्घकाळानंतर सर्वांसमोर आली आहे.  स्वित्झर्लंडमध्ये पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत स्रोफॉलचा आनंद घेतल्यानंतर करिनाचा बिकनी लूक समोर आला आहे. यात करिना कमालीची हॉट दिसतेय.२००८ मध्ये ‘टशन’ चित्रपटासाठी झिरो फिगर बनवत करिनाने सगळ्यांना आपले चाहते बनवले होते. ताज्या फोटोशूटमध्ये करिना त्याच हॉट अवतारात दिसतीयं. इतकी की, बिकनीतील तिचा प्रत्येक फोटो पाहून चाहत्यांच्या तोंडून व्वा निघाल्याशिवाय राहणार नाही.नव्या वर्षाच्या स्वागतासाठी करिना पती सैफ आणि मुलगा तैमूरसोबत स्वीत्झर्लंड येथे गेली होती. याठिकाणी तिने आपल्या परिवारासोबत सुट्या एन्जॉय केल्या. तिच्या या हॉलिडेचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. प्रेग्नंसीदरम्यान करिनाचे वजन खूप वाढले होते.गेल्या काही महिन्यांपासून करिना हे वजन कमी करण्यासाठी घाम गाळत होती. या काळात करिनाने आपले २० किलो वजन कमी केले. यासाठी करिना कडक डाएटवर होती.वर्कआऊट आणि कडक डाएट फॉलो केल्यानंतर आता कदाचित करिना आपल्या परफेक्ट शेपमध्ये पोहोचली आहे. सध्या करिन तैमूरच्या संगोपनासोबतच चित्रपटांतही बिझी आहे. सोबतच फिटनेस आणि फॅशन यावरही करिना सध्या विशेष लक्ष देतेयं.ALSO READ : ​एक्स गर्लफ्रेन्डला समोर पाहून शाहिद कपूरने केले असे काही की, सगळेच झालेत अवाक् !लवकरच करिनाचा ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात करिना व्यतिरिक्त सोनम कपूर, स्वरा भास्कर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. करिना आई झाल्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग बराच काळ थांबले होते. आता करिना आई बनल्यानंतर या चित्रपटातून दमदार कमबॅक करण्यास सज्ज आहे.