Join us  

सुशांतनंतर आता रियावरही येणार सिनेमा, पुस्तक आणि डॉक्युमेंट्रीही येणार?

By अमित इंगोले | Published: September 28, 2020 2:33 PM

रियाला आता ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आलीये. रियावरून बॉलिवूड दोन भागात विभागलेलं दिसतंय. रियावरून झालेल्या या वादावर आता फिल्ममेकर्स सिनेमा बनवण्याचा विचार करत आहेत.

सुशांत सिंह राजपूत केस अजूनही रहस्य बनून आहे. १४ जूनला अभिनेता सुशांतने आत्महत्या केली होती. या केसमध्ये अभिनेत्याच्या परिवाराने रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावले होते. रियाला आता ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आलीये. रियावरून बॉलिवूड दोन भागात विभागलेलं दिसतंय. रियावरून झालेल्या या वादावर आता फिल्ममेकर्स सिनेमा बनवण्याचा विचार करत आहेत.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सुशांत केसची केवळ देशातच नाही तर देशाबाहेरील मीडियातही चर्चा होत आहे. अनेक फिल्ममेकर्स सुशांतची गर्लफ्रेन्ड रियावर सिनेमा बनवण्याचा विचार करत आहेत. तसेच रियावर एक डॉक्युमेंट्रीही तयार होणार असल्याची माहीत आहे. सिनेमा आणि डॉक्युमेंट्रीसोबतच एक प्रकाशन संस्था रियावर पुस्तक छापण्याचीही तयारी करत आहे. या प्रकाशन संस्थेला अपेक्षा आहे की, रियाने तिची कहाणी सांगणारं एक पुस्तक लिहावं, जे ते प्रकाशित करतील.

याआधी सुशांत सिंह राजपूतवरही अनेक फिल्ममेकर्स सिनेमा बनवण्याचं प्लॅनिंग केलं आहे. आता हे बघावं लागेल की, सुशांत आणि रियापैकी कुणाचा सिनेमा आधी बघायला मिळतो. रियाबाबत सांगायचं तर तिला ८ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. नंतर तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने तिची न्यायालयीन कोठडी ६ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. 

रियाचे अनेक ड्रग्स पेडलर्ससोबतचे कनेक्शन समोर आले होते. रियावर आरोप आहे की, ती सुशांतसाठी ड्रग खरेदी करत होती. रियाने अनेकदा कोर्टात जामीन अर्ज केलाय. पण तिच्यावर आरोप इतके गंभीर आहेत की, ती तुरूंगातून बाहेर येऊ शकली नाही. जर रियावर सिनेमा बनला तर तिच्या नजरेतून या गोष्टींकडे बघणे प्रेक्षकांसाठी मजेदार ठरेल.

हे पण वाचा :

खुश? की आणखी काही बाकी...! सुशांतबद्दलच्या सारा-श्रद्धाच्या खुलाशानंतर संतापली स्वरा भास्कर

बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय तपास यंत्रणेवर दबावाचा प्रयत्न; रिया चक्रवर्तीच्या वकिलाचा दावा

"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड