Join us  

साउथनंतर हॉलिवूडमध्ये अभिनयाचा डंका वाजवण्यासाठी 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 1:21 PM

Allu Arjun: 'पुष्पा: द राइज' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धनुषनंतर अल्लू अर्जुनही हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

साउथच्या चित्रपटांसोबतच तिथले स्टार्सही खूप चर्चेत असतात. राम चरण (Ram Charan) असो की KGF2 मधला अभिनेता यश, प्रत्येकजण आपल्या लूकमुळे चर्चेत येत असतात. साउथच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडच्या चित्रपटांवर पाणी फेरले आहे. पूर्वी साउथचे स्टार्स बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याचा विचार करत असत, पण आता ते या सगळ्याच्या एक पाऊल पुढे गेले आहेत. 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटामुळे चर्चेत असलेला साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धनुषनंतर अल्लू अर्जुनहीहॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

साउथचा स्टार धनुषने अलीकडेच 'ग्रे मॅन' या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तेव्हापासून त्यांच्याबद्दल बरीच चर्चा आहे. धनुषने हॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही आपली चमक दाखवली आहे. आता त्याच पावलावर पाऊल ठेवत अल्लू अर्जुनही हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, दक्षिणेकडील स्टारने न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेड दरम्यान हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला आहे. असे सांगितले जात आहे की अल्लू सुपरहिरो फ्रँचायझीच्या अनेक बड्या लोकांना भेटला आहे. जर ही बातमी खरी असेल तर अल्लू अर्जुन लवकरच मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या या मालिकेत सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग बनला होता.

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला, जो २०२३ साली प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पाहॉलिवूड