Join us  

कन्फर्म! सोनू सूदनंतर ‘या’ अभिनेत्रीनेही सोडला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 1:42 PM

बॉलिवूड अभिनेत्री सध्या ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ पूर्ण करण्यात बिझी आहे. पण कंगनाच्या अडचणी इतक्यात तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. 

बॉलिवूड अभिनेत्री सध्या ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ पूर्ण करण्यात बिझी आहे. पण कंगनाच्या अडचणी इतक्यात तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. दोन दिवसानंतर या चित्रपटाचा टीजर रिलीज होतोय. पण त्याआधी एका बातमीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. होय, सोनू सूदनंतर अभिनेत्री स्वाती सेमवाल हिने ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’तून अंग काढून घेतले आहे. होय, स्वाती या चित्रपटात सोनू सूदच्या पत्नीची भूमिका (सदाशिवराव भाऊची पत्नी पार्वती) साकारताना दिसणार होती. खरे तर स्वातीने हा चित्रपट सोडल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या. पण या बातम्यांना दुजोरा मिळाला नव्हता. मात्र आता खुद्द स्वातीने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. हा चित्रपट सोडल्याचे तिने जाहिर केले. सोनू सूदने चित्रपट सोडल्यानंतर माझ्या भूमिकेला किती महत्त्व मिळेल, याबद्दल मी साशंक होते. आधी चित्रपट सोडण्याबद्दल माझ्या मनात गोंधळ होता. यानंतर मी माझ्या टीमशी चर्चा केली आणि या चर्चेअंती ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ सोडण्याचा निर्णय पक्का केला, असे स्वातीने सांगितले.सदाशिवराव भाऊची व्यक्तिरेखा आधी सोनू सूद साकारणार होता. पण अखेरच्या टप्प्यात कंगनाने ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’च्या दिग्दर्शनाची सूत्रे स्वत:च्या हाती घेतली. यापश्चात अचानक सोनू सूदने चित्रपट सोडल्याची बातमी आली़ आता सोनू सूदची भूमिका जीशान अयूब साकारणार आहे.दरम्यान ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’च्या दिग्दर्शनाचे क्रेडिट घेण्यास कंगनाने नकार दिला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश यांच्यासोबत कंगना राणौत हिलाही दिग्दर्शनाचे क्रेडिट देण्याची तयारी झी स्टुडिओने दिली होती. पण कंगनाने म्हणे यास नकार दिला. येत्या २ आॅक्टोबरला या चित्रपटाचा टीजर रिलीज होतोय़ २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होतोय. 

 

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीकंगना राणौतसोनू सूद