Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नेंसीनंतर ह्या अभिनेत्रीने घटविले तब्बल २२ किलो वजन, जाणून घ्या तिचा डाएट प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 15:10 IST

ही अभिनेत्री ४७ वर्षांची असून ती या वयातही आपल्या फिटनेसमुळे तरूण वाटते.

अभिनेत्री मंदिरा बेदीने नुकताच ४७वा वाढदिवस साजरा केला. या वयातही ती आपल्या फिटनेसमुळे तरूण वाटते आणि आजच्या तरूणींसाठी ती प्रेरणा आहे. मंदिरा वर्कआऊट सोबतच डाएटदेखील करते. प्रेग्नेंसीमध्ये मंदिरा बेदीचे वजन खूप वाढले होते. त्यानंतर तिने बावीस किलो वजन घटविले होते. 

मंदिरा बेदीने वजन घटविण्यासाठी सकाळी नाश्त्यामध्ये टोस्ट व कॉफी आणि दुपारी जेवाणात फळे व डाळ चपाती खायची. यासोबतच ग्रीन टीदेखील पिते. रात्री हलका फुलका आहार घेते. मंदिराला जास्त सलाड खायला आवडते. वर्कआऊटनंतर ती लिंबूपानी पिते. 

मंदिरा बेदी फिटनेसबाबत किती क्रेझी आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. एका शोदरम्यान तिला सूत्रसंचालकाने पुशअप्स मारण्याचे चॅलेंज केले होते. त्यावेळी तर मंदिरा साडीत होती तरीदेखील तिने साडीतच पुशअप्स मारून सर्वांना थकीत केले होते. 

मंदिरा बेदीने नव्वदच्या दशकातील मालिका शांतीमध्ये एका स्वावलंबी महिलेची भूमिका साकारून लोकप्रिय झाली होती. याशिवाय तिने दिलवाले दुल्हनिया ले जाएगें चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

मंदिराच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर तिने १९९९ साली दिग्दर्शक राज कौशलसोबत लग्न केले.

त्या दोघांना एक मुलगा आहे. ज्याचे नाव वीर आहे.

मंदिराचा नवरा राज कौशलने सोशल मीडियावर एक मुलगी दत्तक घेतल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते.