Join us  

 तापसी पन्नू बनली अनुराग कश्यपची ‘फेव्हरेट हिरोईन’! साईन केला दुसरा चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 12:32 PM

‘मनमर्जियां’ या चित्रपटानंतर अनुराग कश्यपने पुन्हा एका नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे आणि त्याच्या या चित्रपटात पुन्हा एकदा तापसी पन्नूची वर्णी लागली आहे. 

ठळक मुद्देतापसीकडे सध्या एकापेक्षा एक दमदार चित्रपट आहेत. गेम ओवर, सांड की आंख, मिशन मंगल आणि वूमनिया अशा अनेक चित्रपटात तापसी झळकणार आहे.

गतवर्षी आलेला अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’ हा चित्रपट बराच चर्चेत राहिला. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. पण ‘लव्ह ट्रँगल’ अर्थात प्रेमाचा त्रिकोण दाखवणा-या या चित्रपटातील कलाकारांच्या अदाकारीचे प्रचंड कौतुक झाले. अभिषेक बच्चन, विकी कौशल आणि तापसी पन्नू यात मुख्य भूमिकेत होते. या तिघांच्याही अभिनयाने प्रेक्षक व समीक्षकांची मने जिंकली. या चित्रपटानंतर अनुराग कश्यपने पुन्हा एका नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे आणि त्याच्या या चित्रपटात पुन्हा एकदा तापसी पन्नूची वर्णी लागली आहे. 

ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी काही क्षणांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली. तपासी व अनुराग एका सुपरनॅचरल थ्रीलर चित्रपटात एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनुराग व तापसीच्या या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट सुनीर क्षेत्रपाल प्रोड्यूस करणार आहेत. (सुनीर यांनी अलीकडे ‘बदला’ प्रोड्यूस केला. या चित्रपटातही तापसी पन्नू लीड रोलमध्ये दिसली. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘बदला’ने तूर्तास बॉक्स आॅफिसवर धूम केलीय.) पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

तापसीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिच्याकडे सध्या एकापेक्षा एक दमदार चित्रपट आहेत. गेम ओवर, सांड की आंख, मिशन मंगल आणि वूमनिया अशा अनेक चित्रपटात तापसी झळकणार आहे. त्यामुळे येणा-या दिवसांत बॉक्सआॅफिसवर एकट्या तापसीचा दबदबा असे म्हटले तर वावगे होणार नाही.

टॅग्स :तापसी पन्नूअनुराग कश्यप