Join us
Daily Top 2Weekly Top 5

​श्रीदेवीच्या निधनानंतर लहान मुलासारखे हमसून-हमसून रडले बोनी कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 15:11 IST

श्रीदेवीच्या अकाली मृत्युमुळे अख्खे कपूर कुटुंब धक्क्यात आहे. विशेषत: जान्हवी व खुशी या दोन्ही मुली आणि बोनी कपूर यांना ...

श्रीदेवीच्या अकाली मृत्युमुळे अख्खे कपूर कुटुंब धक्क्यात आहे. विशेषत: जान्हवी व खुशी या दोन्ही मुली आणि बोनी कपूर यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. श्रीदेवींनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा पती बोनी कपूर त्यांच्याजवळ होते. खरे तर श्रीदेवींना सरप्राईज देण्यासाठी ते शनिवारीच मुंबईहून दुबईला गेले होते. बोनी दुबईला पोहोचताच थेट श्रीदेवी थांबलेल्या हॉटेलात गेले. त्यांनी श्रीदेवींना उठवले. दोघांनीही पंधरा मिनिटे गप्पा केल्यात. यानंतर डिनरला जायचे म्हणून श्रीदेवी फ्रेश व्हायला बाथरूमध्ये गेल्या. पण १५ मिनिटे होऊनही त्या बाहेर आल्या नाहीत. बोनी यांनी दार ठोठावले. पण आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी श्रीदेवी बाथटबमध्ये   बेशुद्धावस्थेत आढळल्या. बोनी यांनी सर्वप्रथम त्यांना शुद्धीत आणण्यात प्रयत्न केलेत. यानंतर त्यांना त्वरित रूग्णालयात हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच बोनी कपूर हमसून हमसून रडू लागले. ‘मॉम’मध्ये श्रीदेवींच्या पतीची भूमिका साकारणारा पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकीने याबाबत माहिती दिली.

ALSO READ : ​सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवींनी केल्या होत्या २९ शस्त्रक्रिया, हेच तर ठरले नाही मृत्यूचे कारण?

मी सध्या दुबईत आहे. काल रात्री मी बोनी कपूर यांना भेटलो. ते लहान मुलासारखे रडत होते. श्रीदेवींच्या निधनाने ते पूर्णपणे खचले आहेत. वारंवार श्रीदेवीच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून येत आहे. त्यांची अवस्था अतिशय खराब आहे. यातही कायदेशीर चौकशीला त्यांना सामोरे जावे लागले,असे सिद्दीकी यांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी मी सुद्धा बोनी कपूर, श्रीदेवी यांच्यासोबत मोहितच्या लग्नात होतो. श्रीदेवी या लग्नात प्रचंड सुुंदर दिसत होत्या. त्या आज आपल्यात नाही, यावर माझा विश्वास बसत नाहीये, असेही सिद्दीकी यांनी सांगितले.