वृत्तानुसार बोनी कपूर यांनी जेव्हा त्यांची पहिली पत्नी मोना कपूरला घटस्फोट देऊन श्रीदेवी यांच्याशी विवाह केला होता, तेव्हापासून अर्जुन श्रीदेवी आणि त्यांच्या दोन्ही मुलींचा तिरस्कार करायचा. एका मुलाखतीत तर अर्जुनने हेदेखील म्हटले होते की, खुशी आणि जान्हवीसोबत माझे कुठल्याही प्रकारचे नाते नाही. आम्ही एकमेकांना फारसे भेटत नाही. शिवाय एकमेकांसोबत कधी वेळही व्यतीत करीत नाही. त्यामुळे हे नाते माझ्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नाही. एवढेच काय तर अर्जुन श्रीदेवीलादेखील फारसे पसंत करीत नव्हता. त्याने श्रीदेवी यांच्याबद्दल म्हटले होते की, त्या केवळ माझे वडील बोनी कपूर यांची पत्नी आहेत.
अर्जुन बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी मोना कपूरचा मुलगा आहे. अर्जुनला अंशुला नावाची एक बहीण आहे. जून १९९६ मध्ये बोनी यांनी श्रीदेवी यांच्याशी विवाह केला होता. यामुळे अर्जुन कपूरची आई मोना कपूरला प्रचंड धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्याशी लग्न केल्यानंतर बोनी मोना कपूरपासून दूर झाले होते. दरम्यान, अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी ‘नमस्ते इग्लंड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.