'तुम बिन'चा सिक्वेल चा र वर्षांच्या ब्रेकनंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:10 IST
चार वर्षांच्या ब्रेकनंतर अनुभव सिन्हा आता पुन्हा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात कमबॅक करत आहे. यासाठी त्याने त्याच्या एका हिट रोमँटिक चित्रपट ...
'तुम बिन'चा सिक्वेल चा र वर्षांच्या ब्रेकनंतर...
चार वर्षांच्या ब्रेकनंतर अनुभव सिन्हा आता पुन्हा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात कमबॅक करत आहे. यासाठी त्याने त्याच्या एका हिट रोमँटिक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. २00१ मध्ये प्रदर्शित झालेला 'तुम बिन' चित्रपट सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यातील गाणेही खुप हिट झाले होते. त्यावेळी नवीन अभिनेते प्रियांशु चॅटर्जी, हिमांशु मलिक, राकेश वशिष्ठ आणि सांदली सिन्हा यांनी महत्त्वाच्या भूमिकेत काम केले आहे. हा चित्रपट युवकांमध्ये खुप प्रसिद्ध झाला होता. त्यावेळच्या काही महत्त्वाच्या रोमँटिक चित्रपटांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनात आता 'तुम बिन २' ची तयारी सुरू आहे. सध्या सिक्वेल चित्रपटांची जास्त चलती आहे. या चित्रपटांत नव्या कलाकारांना संधी देणार असून पुढील वर्षी चित्रपट शूटिंग सुरू करण्यात येणार आहे. अनुभव सिन्हा म्हणाले की,' भूषण कुमार त्यांना २0१0 पासून 'तुम बिन २' बनवण्याचा आग्रह करत आहेत. पण, त्यांच्याकडे स्टोरीची काहीही आयडिया नव्हती. त्यांनी चार महिन्यांपूर्वी चित्रपटाची स्टोरी लिहिली आहे.