Join us

रणवीर सिंगनंतर आता बॉलिवूडचा हा अभिनेता दिसणार पोलिसाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 20:44 IST

अभिनेता रणवीर सिंगने सिम्बा चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता बॉलिवूडमधील आणखीन एक अभिनेता पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देदिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आयुषमान

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणासाठी २०१८ हे वर्ष खूप खास ठरले. यावर्षात त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 'अंधाधून' आणि 'बधाई हो' या दोन्हीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी आयुषमान सज्ज झाला आहे. लवकरच तो पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

आयुषमानने 'बरेली की बर्फी', 'बधाई हो', 'अंधाधून' यासारख्या चित्रपटातून त्याच्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. आता तो दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या आगामी चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण कानपूर येथे करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असणार आहे. 

याबाबत आयुषमान म्हणाला की, अद्याप याबाबत अनेक गोष्टींची चर्चा करणे बाकी आहे. आणखी बरेचसे निर्णय घ्यावे लागणार आहेत. जेव्हाही हे निर्णय घेण्यात येतील तेव्हाच चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येईल. आयुष्मानला पोलिसाच्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहतेही उत्सुक आहेत. अलिकडेच रणवीर सिंगनेही 'सिंबा' चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली होती. अक्षय कुमार, आमिर खान, अजय देवगन आणि सलमान खान यांनीही चित्रपटांमध्ये पोलिसाची भूमिका साकारली आहे. आता आयुषमान पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांना भुरळ पाडेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :आयुषमान खुराणारणवीर सिंग