Join us

तैमूरच्या जन्मानंतर पहिल्यांदा करिना कपूर खानने केले फोटोशूट..क्लिक करा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 15:10 IST

करिना कपूर खानच्या घरी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तैमूर अळी खान पटौदीचे आगमान झाले. तैमूरच्या जन्मानंतर पहिल्यांदाच करिनाने एका मॅगझिनच्या ...

करिना कपूर खानच्या घरी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तैमूर अळी खान पटौदीचे आगमान झाले. तैमूरच्या जन्मानंतर पहिल्यांदाच करिनाने एका मॅगझिनच्या कव्हर फोटोसाठी फोटोशूट केले आहे. तैमूरच्या जन्मानंतर करिनाने पहिल्यांदाट फक्त फोटोशूट नाही केले तर रॅम्प वॉक पण केला. खूप दिवसानंतर करिना फिल्मफेअरच्या कॅव्हरवर पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये ती खूप स्टनिंग दिसते आहे. प्रेग्नेंसीनंतर करिनाने आपले वाढलेले वजनसुद्धा कमी केले आहे. हे फोटोशूट बघून करिनाचे फॅन्स खूपच खूष आहेत. कारण तैमूरच्या जन्मानंतर पहिल्यांदाच करिनाने अधिकृत फोटोशूट केले आहे. सध्या ती सोनम कपूर आणि स्वरा भास्करसोबत वीरे दी वेडिंगची शूटिंग करते आहे. आई झाल्यानंतर तिचा हा पहिला चित्रपट आहे.  वीरे दी वेडिंगचे दिग्दर्शन सोनमची बहीण रिया कपूर करतेय. शूटिंगसाठी जाताना एअरपोर्टवरचे तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. यात तिच्या कडेवर चिमुकला तैमूर रडताना दिसला होता. प्रेग्नेंसीच्या आधी करिनाने हा चित्रपट साईन केला होता.करिना यात एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. बेबो प्रॅक्टिकल तर सोनमला थोडीशी हळवी असेल. आपल्याला जे वाटते, ज्यामुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करण्यात ती विश्वास ठेवणारी मुलगी आहे.करिना कपूरला या चित्रपटाची स्क्रिप्ट फारच आवडली होती.  हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू करण्याची करिना, तैमूर आणि सैफ अली खानसह व्हेकेशनवर स्वित्झर्लंड जाऊन आली आहे.