Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेक वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माने केला नवा लूक, चाहत्यांची मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 16:19 IST

अनुष्का शर्माने नवीन लूक केला असून त्याचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी सोशल मीडियावर ती सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि बऱ्याचदा फोटोमुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तिने नवा हेअरकट केला आहे. ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

अनुष्का शर्माने नवीन हेअरकट केला असून त्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनुष्काने पांढऱ्या रंगाचे टॉप आणि मस्टर्ड रंगाचे लहान जॅकेट घातले आहे. तिचा लूक तिच्या चाहत्यांना खूप भावला आहे. फोटो शेअर करत अनुष्काने सांगितले की, जेव्हा बाळाच्या जन्मानंतर गळणारे केस तुम्हाला एक चांगला हेअर कट करण्यासाठी प्रोत्साहन देतात.' यासोबतच सोनम कपूरने तिचा हेअर स्टायलिस्ट सुचवून अनुष्काचे काम सोपे केल्यामुळे अनुष्काने सोनमचे आभार मानले आहेत.

अनुष्काच्या फोटोंवर कमेंट करताना तिचे चाहते तिच्या नवीन स्टाईलचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने म्हटले की,'तुम्ही खूप चमकत आहात.' दुसरीकडे, आणखी एका चाहत्याने लिहिले, 'फॅंटॅस्टिक.' अनुष्काचा या फोटोला दहा लाखांहून जास्त पसंती मिळाली आहे.

अनुष्का शर्मा लेक वामिकाचा जन्म झाल्यापासून खूप काळजी घेताना दिसते. सध्या अनुष्का नवरा विराट कोहली आणि मुलगी वामिकासमवेत इंग्लंडमध्ये आहे. विराट कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला आहे. तिथल्या वातावरणाचा आनंद लुटत असताना अनुष्का काही फोटो देखील शेअर केले होते. 

अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती शाहरूख खान आणि कतरिना कैफसोबत 'झिरो' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने ब्रेक घेतला होता. 
टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली