Join us

कॅन्सरशी झुंज दिलेल्या या अभिनेत्रीला करायचं बॉलिवूमध्ये कमबॅक, पण या अटीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 13:56 IST

सुदैवाने ती सर्जरी यशस्वी झाली आणि मी जिवंत परतले, हे सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

कॅन्सरला मात देऊन अभिनेत्री सोनाली बेद्रें भारतात परतली आहे. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार, सोनालीला आता पुन्हा सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. रिपोर्टनुसार सोनाली म्हणाली, या आजारानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आता मी पैशासाठी काम नाही करणार. आता मी फक्त तेच काम करणार जे करताना मला आनंद मिळेल. शेवटची सोनाली एका रिअॅलिटी शोचे परीक्षण करताना दिसली होती.

कॅन्सरला मात करुन सोनाली भारतात परतली आहे.  जुलै २०१८ मध्ये सोनालीला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. कर्करोगाच्या निदानानंतर सोनाली उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाली होती. कर्करोगाशी लढताना इतरांना प्रेरणा देण्यासाठी सोनालीने कायमच तिचा हा प्रवास सामाजिक माध्यमांवर शेअर केला होता.

एका मुलाखती दरम्यान सोनालीने सांगितले होते की,  कॅन्सरचे निदान हा माझ्यासाठी धक्का होता. पुढचा प्रवास कसा असेल, या विचाराने माझी तहान-भूक हरवली होती. या आजारासाठी मीच जबाबदार आहे, असा विचार करून करून मी दिवसरात्र रडायचे. स्वत:ला दोष द्यायचे.

न्यूयॉर्कमध्ये उपचारासाठी गेल्यावर मानसोपचार तज्ज्ञाने ने मला यातून मला बाहेर काढले. उपचारादरम्यान माझ्यावर एक मोठी सर्जरी करावी लागणार होती. यातून मी वाचेल की नाही, याचीही शाश्वती नव्हती. माझ्या मुलाला मी पुन्हा पाहू शकेल की नाही, हीही शाश्वती नव्हती. सर्जरीला जाताना माझ्या बहिणीने मला घट्ट मिठी मारली. तो क्षण माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी होता. सुदैवाने ती सर्जरी यशस्वी झाली आणि मी जिवंत परतले, हे सांगताना सोनालीच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.   

टॅग्स :सोनाली बेंद्रेकर्करोग