Join us  

​ ‘बाहुबली’नंतर एस. एस. राजमौली यांच्या नव्या धमाकेदार चित्रपटाचा टीजर आऊट! ‘या’ दोन सुपरस्टार्सची लागली वर्णी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 9:23 AM

‘बाहुबली’ सीरिजनंतर दिग्दर्शक एस. एस. राजमौली काय नवे घेऊन येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्याचा खुलासा झालायं.

‘बाहुबली’ सीरिजनंतर दिग्दर्शक एस. एस. राजमौली काय नवे घेऊन येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्याचा खुलासा झालायं. होय,‘#आरआरआर’ नामक चित्रपट राजमौली घेऊन येत आहेत. आता या चित्रपटातील स्टारकास्ट जाणून घ्यायला तुम्ही उत्सूक असाल तर यात साऊथचे दोन बडे सुपरस्टार्स राम चरण तेजा आणि ज्युनिअर एनटीआर  यांची वर्णी लागली आहे.‘बाहुबली’च्या अपार यशानंतर प्रत्येक स्टारला राजमौलीसोबत प्रोजेक्ट करायचा आहे. आज प्रत्येक जण त्यांचा चाहता आहे. अशात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण तेजा यांना ही संधी मिळाली आहे.‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’ बनवून भारतीय सिनेमा एका नव्या उंचीवर घेऊन जाणारे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी आज ‘#आरआरआर’ या चित्रपटाचा टीजर रिलीज केला. या टीजरबद्दल बोलायचे तर, चित्रपटाचे नाव जाहिर करण्याची ही अनोखी पद्धत चाहत्यांना प्रचंड भावली आहे. यापूर्वी कधीही अशा अंदाजात चित्रपटाचे नाव जाहिर झालेले नाही.राजमौली यांनी या चित्रपटासाठीच्या तयारीसाठी एनटीआर आणि राम चरण तेजा यांना अमेरिकेत पाठवले होते. आता लवकरच चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. रामचरण तेजा साहजिकच प्रचंड उत्सूक आहे. ‘ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. राजमौली यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो,’ असे तो म्हणाला. रामचरण तेजा हा सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. तर एनटीआर ज्युनिअर साऊथचे महानायक एनटीआर यांचे चिरंजीव आहेत. ‘बाहुबली’च्या पहिल्या भागात राजमौली एक लहानशी भूमिका करताना दिसले होते. चित्रपटाच्या एका गाण्यात राजामौली मद्यविक्री करताना दिसले होते. राजामौली यांची ही भूमिका कदाचित प्रेक्षकांनी फारशी नोटीस केली नव्हती, मात्र कालांतराने ही बाब उघड झाली होती.