Join us

स्वप्न पूर्ण करणार? 'अ‍ॅनिमल' नंतर आता संदीप रेड्डी वांगा मायकल जॅक्सनवर बायोपीक बनवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 19:30 IST

'अ‍ॅनिमल' नंतर संदीप रेड्डी वांगा मायकल जॅक्सनवर बनवणार बायोपीक. व्यक्त केली इच्छा. अभिनेत्याचा शोध सुरु

'अ‍ॅनिमल' सिनेमा २०२३ मध्ये चांगलाच चर्चेत राहिला आणि गाजला. संदीप रेड्डी वांगा यांनी 'अ‍ॅनिमल' सिनेमा दिग्दर्शित केला. सिनेमावर टीकाही झाली पण सिनेमाने बक्कळ पैसा कमावला. अशातच एका मुलाखतीत संदीप यांनी त्यांना आता जगप्रसिद्ध पॉप स्टार - गायक मायकल जॅक्सनवर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केलीय. काय म्हणाले संदीप बघा.

संदीप रेड्डी वंगा यांनी मुलाखतीत सांगितलं की, त्यांना मायकल जॅक्सनवर बायोपिक बनवण्याची इच्छा आहे. ते म्हणाले, "कधी कधी मी मायकल जॅक्सनवर बायोपिक बनवण्याचा विचार करतो. मला मायकल जॅक्सनच्या बायोपिकचे दिग्दर्शन करायचे आहे, पण प्रश्न असा आहे की त्याची भूमिका कोण करणार? त्याच्या भूमिकेत कोण अभिनेता असेल? एखादा योग्य अभिनेता दिसला तर बायोपीक इंग्रजीत बनवून मी हॉलिवूडमध्येही तो रिलीज करु शकतो."

संदीप रेड्डी वांगा पुढे म्हणाले, "मायकल जॅक्सनने बालपणापासून ते शालेय शिक्षणापर्यंत त्याच्या त्वचेचा रंग कसा बदलला आणि तो कसा जगला असं त्याचं सगळं आयुष्य खूपच मनोरंजक आहे. मायकलचा जीवन प्रवास खूपच विलक्षण आहे. पण त्याला पडद्यावर साकारण्यासाठी योग्य अभिनेता कोण असेल? हा मोठा प्रश्न आहे. त्याचा बायोपिक येणं हे माझ्यासाठी स्वप्न असेल." सध्या संदीप प्रभाससोबत आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत.

टॅग्स :रणबीर कपूरहॉलिवूड