Join us  

‘सिम्बा’त अजय देवगणपाठोपाठ अनिल कपूरचीही एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 7:42 PM

 रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची अर्थात ‘सिम्बा’ची घोषणा केली, तेव्हा या चित्रपटात रोहितचा आवडता अभिनेता अजय देवगण कॅमिओ करताना दिसणार, अशी बातमी होती.

 रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची अर्थात ‘सिम्बा’ची घोषणा केली, तेव्हा या चित्रपटात रोहितचा आवडता अभिनेता अजय देवगण कॅमिओ करताना दिसणार, अशी बातमी होती. ‘सिम्बा’च्या क्लायमॅक्समध्ये अजयची एन्ट्री होणार, असेही समजले होते. ही बातमी ऐकून रणवीर सिंग आणि अजय देवगणचे चाहते खूश झाले होते. आज ‘सिम्बा’कडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी अशीच एक बातमी आहे. ‘सिम्बा’मध्ये डबल नाही तर ट्रिपल मज्जा येणार आहे. होय, आता या चित्रपटात बॉलिवूडचा सर्वाधिक एनर्जेटिक अ‍ॅक्टर अर्थात अनिल कपूरची एन्ट्री होणार आहे. अनिल कपूरही या चित्रपटात कॅमिओ करताना दिसतील. रणवीर सिंगने स्वत: याचा खुलासा केला. ‘सिम्बा’च्या सेटवरचा अनिल कपूरसोबतचा एक फोटो त्याने पोस्ट केला. या फोटोत अनिल कपूर रणवीरच्या गालांवर किस करताना दिसतोय.

एकंदर काय तर रणवीर सिंगचे नशीब सध्या चांगलेच जोरावर आहे. कदाचित परमेश्वराला जे मागेल, ते त्याला मिळतेय. ‘सिम्बा’बद्दल आधीच लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यात अजय देवगण आणि अनिल कपूर यांचे कॅमिओ चित्रपटात आणखीच ‘जान’ आणणारे आहेत. ‘सिम्बा’ सुपरडुपर हिट होण्यापासून आता कुणीच रोखू शकत नाही, असेच आता म्हणावे लागेल.

 

टॅग्स :रणवीर सिंगअनिल कपूरअजय देवगण