ALSO READ : watch : -अन् पोल डान्स करताना जखमी झाली जॅकलिन फर्नांडिस!
ए जेंटलमॅन’मध्ये सिद्धार्थ आणि जॅकलिन फर्नांडिसची जोडी दिसणार आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांनी आधीचे डोक्यावर घेतली आहेत. या आधी रिलीज झालेली गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसली आहेत. जॅकलिन आणि सिद्धार्थची हॉट केमिस्ट्री प्रत्येक गाण्यातून दिसते आहे. यात सिद्धार्थ डबल रोलमध्ये दिसणार आहे. गौरव आणि ऋषी नावाच्या तरुणाची भूमिका तो साकारतो आहे. तर जॅकलिन काव्या नावाच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. अॅक्शन व कॉमेडीची भरमार असलेला राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित हा चित्रपट ऑगस्टअखेरिस रिलीज होणार आहे. जॅकलिन आणि सिद्धार्थशिवाय यात सुनील शेट्टीची ही महत्त्वाची भूमिका आहे. मायामीला या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे.