Join us

​आफताब आता ‘टॉम डिक अ‍ॅण्ड हैरी 2’ मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 17:40 IST

 ‘ टॉम डिक अ‍ॅण्ड हैरी 2 ’. या चित्रपटाचे दिपक तिजोरी हे दिग्दर्शक आहेत. आफताब हा एका स्टुडियोमध्ये चित्रपटाची ...

 ‘ टॉम डिक अ‍ॅण्ड हैरी 2 ’. या चित्रपटाचे दिपक तिजोरी हे दिग्दर्शक आहेत. आफताब हा एका स्टुडियोमध्ये चित्रपटाची स्क्रिप्ट रीडींग सेशन अटेंड करीत असताना आफताब दिसून आला. सध्याला त्याचे चित्रपट करिअरचे चांगले चालू नसल्याचे दिसत आहे. त्याची अलीकडेच आलेला  ‘ग्रेड ग्रैंड मस्ती ’ हा चित्रपट यशस्वी राहील अशी आशा होती. परंतु, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चालूच शकला नाही. चित्रपट न चालण्याचे खरे कारण तो प्रदर्शित होण्याच्याअगोदरच लीक झाला. त्यामुळे तो बॉक्स आॅफिसवर चालू शकला नाही. याामध्ये आफताबसह विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख व उर्वशी रौतेला हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते. टॉम डिक अ‍ॅण्ड हैरी2 हा चित्रपट आफताबच्या करिअरला काही वेगळे दिशा देईल का, याची प्रतीक्षा आहे. परंतु, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच ते कळून येईल. आफताबची आतापर्यंतची ‘मस्त’ ‘कसूर’ यासारखी चित्रपट हिट राहिलेली आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून तो बॉक्स आॅफिसवर काही यशस्वी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.