नवविवाहित जोडप्याचे ‘इलू...इलू...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 09:21 IST
फक्त दोनच दिवस झालेत बिपाशा आणि करणसिंगच्या लग्नाला. नातेवाईक, मित्रमंडळी आणि चाहत्यांच्या साक्षीने दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. आता ...
नवविवाहित जोडप्याचे ‘इलू...इलू...’
फक्त दोनच दिवस झालेत बिपाशा आणि करणसिंगच्या लग्नाला. नातेवाईक, मित्रमंडळी आणि चाहत्यांच्या साक्षीने दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. आता ते त्यांच्या आयुष्याच्या नव्या गोड क्षणांचा अनुभव घेत आहेत.एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी आता कुठल्याही कारणाची गरज त्यांना उरली नाही. नुकताच त्यांनी बिपाशाची बहीण विजयेता सोबतचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. बिप्स आणि करणसिंग दोघेही खुप चांगल्या मूडमध्ये दिसत आहेत.‘प्रेमातील शक्ती’ या दोघांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. त्यांच्या लग्नानंतर ग्रँड रिसेप्शनही झाले. या रिसेप्शनला बॉलीवूडमधील मोठमोठे तारे तारका आल्या होत्या.अमिताभ बच्चन पासून ते शाहरूख खानपर्यंत सर्वजण त्यांच्या प्रेमाला आणि लग्नाला संमती देण्यासाठी आले होते. बिपाशा आणि करणसिंग हे हॉरर चित्रपट ‘अलोन’ पासून एकमेकांसोबत डेटवर जात आहेत.