Join us

गायक अदनान सामीने शेअर केला चिमुकल्या मदीनाचा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 21:38 IST

काही दिवसांपूर्वीच गायक अदनान सामी आणि त्याची पत्नी रोया सामी यांच्या घरी एका चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. अदनानने ...

काही दिवसांपूर्वीच गायक अदनान सामी आणि त्याची पत्नी रोया सामी यांच्या घरी एका चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. अदनानने ही बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आज अदनानने आपल्या चिमुकल्या मदीनाची झलक दाखविणारे काही फोटोज् शेअर केले असून, त्यास चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसात मिळत आहे. अदनानने मुलीचे नाव मदीना असे ठेवले आहे. दरम्यान, फोटो शेअर करताना अदनानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला माझी चिमुकली मुलगी मदीना आणि पत्नी सामीचा फोटो शेअर करताना खूप आनंद होत आहे. ईश्वराने नेहमीच हिच्यावर कृपादृष्टी असू द्यावी.’ अदनानने शेअर केलेल्या या दोन फोटोंविषयी सांगायचे झाल्यास, एका फोटोमध्ये अदनान आणि त्याची पत्नी मुलगी मदीनासोबत दिसत आहेत. दोघेही आपल्या चिमुकलीच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसत आहेत. तर दुसºया छायाचित्रात केवळ मदीना दिसत असून, ती एखाद्या परीसारखी दिसत आहे.  काही दिवसांपूर्वी मदीनाविषयी बोलताना अदानानने म्हटले होते की, ‘मदीनामुळे आमच्या आयुष्य आनंदाने भरून गेले आहे. मी आणि माझी पत्नी सुरुवातीपासूनच मुलीचा विचार करीत होतो.’ ८ मे २०१७ रोजी मदीनाचा जन्म झाला असून, अदनानच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. जेव्हा अदनानला ‘मदीना’ या नावाविषयी विचारण्यात आले होते, तेव्हा त्याने म्हटले की, ‘मी माझ्या मुलीचे नाव मदीना शहरावर ठेवले आहे. हे नाव प्रेषित मुहंमद पैगंबर साहेबांची आठवण करून देते. आज त्या शहराला प्रेम आणि आदरासाठी ओळखले जाते. असे म्हटले जाते की, त्याठिकाणी तुम्हाला सर्वात मधुर अजान ऐकायला मिळते. ज्यामुळे तुमच्यात आध्यात्मिकतेचा संचार होतो. यामुळेच मला असे वाटले की, मुलीचे नाव ‘मदीना’ ठेवावे.’