Join us  

अदनान सामीचं वजन पुन्हा जैसे थे! लेकीसोबत विमानतळावर दिसला अन् झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 3:55 PM

अदनानचं वजन ७५ किलोपर्यंत आलं होतं. मात्र आता पुन्हा त्याचं वजन वाढलेलं दिसत आहे.

गायक अदनान सामी (Adnan Sami) मधल्या काळात त्याच्या वजनामुळे चर्चेत होता. पूर्वी त्याचं वजन २०० किलोंपेक्षाही जास्त होतं.अचानक त्याने तब्बल १५५ किलो वजन कमी केलं होतं. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच अचंबित झाले होते. अदनानचं वजन ७५ किलोपर्यंत आलं होतं. मात्र आता पुन्हा त्याचं वजन वाढलेलं दिसत आहे. नुकताच तो कुटुंबासोबत विमानतळावर दिसला. त्याला पाहून चाहत्यांनाही धक्का बसला.

अदनान सामी पत्नी आणि मुलीसोबत मुंबई विमानतळावर दाखल झाला. तेव्हा त्याचं वजन पुन्हा वाढलेलं दिसत आहे. तर त्याची मुलगी 'अदीना' खूपच क्युट दिसत होती. अदनानने ब्लॅक पोलो टीशर्ट आणि ब्लू डेनिम परिधान केली होती. पापाराझींसमोर हसतच त्याने पोज दिली. मात्र त्याचं वाढलेलं वजन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तर त्याच्यासोबत रोया ही त्याची तिसरी पत्नी आहे. २०१७ साली त्यांना मदीना ही मुलगी झाली.

अदनानचा लुक पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.'याचं वजन परत वाढलं' असं म्हणत त्याला ट्रोल केलं आहे. अदनानचं वय सध्या ५१ वर्ष आहे. आता त्याचं वजन परत वाढत असल्याने चाहत्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. अदनानची मुलगी मदीना त्याच्यासाठी लकी चार्म आहे.

टॅग्स :अदनान सामीबॉलिवूडट्रोलसोशल मीडिया