Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य-श्रद्धा पुन्हा प्रेक्षकांना दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:28 IST

आदित्य राय कपूर आणि श्रद्धा कपूरने ‘आशिकी २’ मध्ये सोबत काम केले होते, ज्याने बॉक्स आॅफिसवर दर्जेदार यश संपादन ...

आदित्य राय कपूर आणि श्रद्धा कपूरने ‘आशिकी २’ मध्ये सोबत काम केले होते, ज्याने बॉक्स आॅफिसवर दर्जेदार यश संपादन करून व्यावसायिक तज्ज्ञांना चकित केले. या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी आदित्य-श्रद्धा मध्ये रोमांसला सुरुवात झाली होती, मात्र नंतर दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले.चर्चा अशी आहे की,‘ या जोडीच्या केमिस्ट्रीने  प्रभावित होऊन निर्देशक शाद अलीने आपल्या पुढील चित्रपटात दोघांना घेतले आहे. चित्रपटाचे नाव आहे ‘ओके जानू’. हा दक्षिण भारतीय चित्रपट ‘ओ कधल कनमनी’ चा रिमेक आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या मार्चपासून प्रारंभ होणार आहे. निर्माता म्हणून करण जोहर काम बघणार असून चित्रीकरणासाठी दिल्लीला अधिक पसंती देण्यात येणार असल्याचे समजते.