आदित्य रॉय-कपूर अन् क्रिती सॅनन ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 23:11 IST
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत ‘हिरोपंती’ आणि वरुण धवनसोबत ‘दिलवाले’, सुशांत सिंग राजपूतसोबत आगामी ‘राब्ता’ आणि आयुष्यमान खुराणा याच्यासोबत ‘बरेली ...
आदित्य रॉय-कपूर अन् क्रिती सॅनन ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स!
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत ‘हिरोपंती’ आणि वरुण धवनसोबत ‘दिलवाले’, सुशांत सिंग राजपूतसोबत आगामी ‘राब्ता’ आणि आयुष्यमान खुराणा याच्यासोबत ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात रोमान्स करणारी अभिनेत्री क्रिती सॅनन लवकरच अभिनेता आदित्य रॉय-कपूर याच्याबरोबर रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. होय, ही बातमी पूर्णत: खरी असून, लवकरच हे दोघेही निर्माता वासू भगनानी यांच्या चित्रपटात बघावयास मिळणार आहेत. खरं तर आदित्यला या चित्रपटासाठी अगोदरच साइन करण्यात आले आहे. आता क्रितीबरोबर चित्रपटाविषयी चर्चा केली जात असून, ती आदित्यबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे समजते. जर क्रितीने हा चित्रपट साइन केल्यास, पहिल्यांदाच हे दोघे स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहेत. दरम्यान चित्रपटाची कथा अद्यापपर्यंत निश्चित झाली नसून, आदित्य आणि क्रिती व्यतिरिक्त चित्रपटात आणखी कोण-कोण मोठे स्टार्स असतील याबाबतचा अद्यापपर्यंत उलगडा केला गेला नाही. खरं तर निर्मात्यांनी चित्रपटाविषयी प्रचंड सस्पेन्स ठेवला असल्याने अधिक माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र एक गोष्ट निश्चित की, निर्मात्यांना आदित्यसोबत यापूर्वी काम केलेल्या अभिनेत्रीला रिपिट करायचे नाही. वास्तविक निर्मात्यांना आदित्य आणि श्रद्धाच्या जोडीला सहज साइन करता आले असते. परंतु या दोघांनी यापूर्वी एकत्र काम केलेले असल्यानेच श्रद्धाला या चित्रपटाविषयी विचारणा केली गेली नाही. क्रितीच्या इतर प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास, ती पुढच्या आठवड्यात रिलीज होणाºया ‘राब्ता’मध्ये सुशांत सिंग राजपूत याच्याबरोबर झळकणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. गेल्या आठवड्यात जेव्हा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाला दाखविण्यात आला तेव्हा बोर्डाने चित्रपटातील अश्लील भाषा आणि किस सीन्स डिलीट करण्याचे निर्मात्यांना सुचविले; मात्र निर्मात्यानी सेन्सॉरने सुचविलेले सीन्स डिलीट केले नसल्यास चित्रपटाला ‘यू/ए’ सर्टिफिकेट दिले जाण्याची शक्यता आहे.