Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कॅटरिनाला नाही तर ‘हिला’ डेट करतोय आदित्य राय कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 13:33 IST

आदित्य राय कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ब्रेकअपची बातमी आता जुनी झालीय. कारण पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय. आदित्य ...

आदित्य राय कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ब्रेकअपची बातमी आता जुनी झालीय. कारण पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय. आदित्य आणि श्रद्धा दोघेही आपआपला भूतकाळ विसरून आपल्या करिअरसह आयुष्यात पुढे निघाले आहेत. मध्यंतरी श्रद्धा कपूर फरहान अख्तरला डेट करीत असल्याची चर्चा रंगली. तशीच आदित्य कॅटरिना कैफ हिच्या प्रेमात पडल्याची बातमी आली. अर्थात दोघांनीही या बातम्यांचे खंडन केले. असे काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशातच आता एक नवी बातमी कानावर येतेय. ही बातमी म्हणजे आदित्य राय कपूर आणि इंटरनॅशनल ब्युटी एक्सपर्ट मारियाना मुकचैन या दोघांबद्दल. होय, आदित्य कॅटरिना नाही तर मारियानाला डेट करीत असल्याची खबर आहे. सूत्रांचे खरे मानाल तर आदित्य व मारियाना गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. परिणीती चोप्रा आणि आदित्य हे दोघे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये आले होते. तेव्हा मारियाना ही परिणीतीची मेकअप आर्टिस्ट होती.आदित्य व मारियाना या दोघांनी अलीकडे ब्लॅक रॉक सिटीमध्ये ‘द बर्निंग फेस्टिवल’ अटेन्ड केला होता. इतकेच नाही तर सोनम कपूरच्या दिवाळी पार्टीतही हे दोघे सोबत होते. मात्र रिलेशन उघड होऊ नये म्हणून दोघेही वेगवेगळ्या कारने या पार्टीत पोहोचले होते. अर्थात इतके करूनही एका कोप-यात एकमेकांची गळाभेट घेतांना हे दोघे कॅमेºयात कैद झाले होते.मीडियात हे रिलेशन उघड व्हावे, असे मारियानाची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे आदित्य आणि मारियाना दोघेही आपल्या रिलेशनबद्दल सध्या अतिशय गुप्तता पाळताना दिसत आहेत. खरे तर मारियानाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जरा नजर टाकली की, ती खाण्या आणि फिरण्याची किती ‘शौकीन’ आहे, हे तुम्हाला दिसेल. आदित्यलाही फिरायला प्रचंड आवडतं. कदाचित याच कॉमन हॉबीमुळे हे दोघे एकत्र आले असावेत.परिणीतीशिवाय मारियाना अनुष्का शर्मा, पूजा हेगडे, इलियाना डिक्रूज आणि ऐश्वर्या राय आदी अभिनेत्रींची मेकअप आर्टिस्ट राहून चुकली आहे.