Join us

​अभिषेकला आदिती म्हणाली दगडं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 20:07 IST

ज्युनियर बच्चन बॉक्स आॅफिसवर नाही तर निदान ट्विटरवर तरी आपले कौशल्य दाखवण्यात मागे राहत नाही. महानायक अमिताभ बच्चनचा मुलगा ...

ज्युनियर बच्चन बॉक्स आॅफिसवर नाही तर निदान ट्विटरवर तरी आपले कौशल्य दाखवण्यात मागे राहत नाही. महानायक अमिताभ बच्चनचा मुलगा म्हणून अभिषेकवर अपेक्षांचे खूप मोठे ओझे आहे. त्याच्या परीने ते पेलण्याचा तो प्रयत्न करतो. त्याची टिंगल-टवाळी करण्याची अनेकजण संधी सोडत नाही.स्टँड अप कॉमेडियन आदिती मित्तलने धाकट्या बच्चनच्या अभिनय क्षमतेवरच प्रश्न उपस्थित करून त्याचा राग ओढावून घेतला. तिने ट्विट केले की, ऐश्वर्याला प्रथम झाडासोबत लग्न करावे लागले कारण त्यानंतरच ती दगडाशी लग्न करू शकली. आता अभिषेकच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स आणि दगडाचे भाव एकच आहेत नाही का?’यावर अभिषेकने तिला उत्तर दिले की, ‘आदिती तुझ्या ट्विटमध्ये तू दिलेले प्रश्न चिन्ह स्पष्टपणे सुचवत आहे की, तुलादेखील माझ्या चांगल्या अभिनयाची कल्पना आहे.’ आदितीने मग जरा नरमाई घेत त्याला ‘रॉकस्टार’ म्हटले. आता रॉक म्हणजे पुन्हा दगडच!