Join us

आदितीने साकारली तब्बूची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:27 IST

 कॅटरिना आणि आदित्य रॉय कपूर या दोघांनीही त्यांचा आगामी चित्रपट ‘फितूर’ साठी अक्षरश: जीव ओतून काम केले आहे. त्यामुळे ...

 कॅटरिना आणि आदित्य रॉय कपूर या दोघांनीही त्यांचा आगामी चित्रपट ‘फितूर’ साठी अक्षरश: जीव ओतून काम केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद फितूरला मिळतो याकडे खरंतर सर्वांचे लक्ष टिकून राहिले आहे. तब्बूने चित्रपटात बेगम हजरत हिची भूमिका केली असून आदिती राव हैदरी हिने चित्रपटातील ‘तरूण ’ तब्बूची भूमिका साकारली आहे. सध्या आदितीचा लूक हा गुपीत ठेवण्यात आला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरच आपल्याला कळेल की, ‘आदिती राव किती तब्बूसारखी दिसते ते!’