ही अभिनेत्री लवकरच करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 11:17 IST
अभिनेत्री नोरा फतेही बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायला सज्ज आहे. नोराने 'रोरः टाइगर्स ऑफ द सुंदरबंस'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले ...
ही अभिनेत्री लवकरच करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक
अभिनेत्री नोरा फतेही बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायला सज्ज आहे. नोराने 'रोरः टाइगर्स ऑफ द सुंदरबंस'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती बिग बॉस सीझन 9 या वादग्रस्त रिअॅलिटी शोने.बिग बॉसनंतर नोरा झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. नोराच्या हाती बॉलिवूडचे काही बिग बजेट चित्रपट लागले नसले तरी तिने साऊच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. 'बाहुबली'च्या मनोहरी गाण्यात तिची प्रभाससोबत जबरदस्त केमिस्ट्री दिसली होती. नोरा आता 'माय बर्थडे सांग' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यात तिच्यासोबत संजय सुरीसुद्धा दिसणार आहे. याचित्रपटाचे दिग्दर्शन समीर सोनी केले आहे. ALSO READ : ‘स्वॅग से स्वागत’वर नोरा फतेहीचा ‘कातिलाना’ डान्स!नोरा यात एका एनआरआय महिलेची भूमिका साकारते आहे. जा राजीव कौल (संजय सूरी)च्या बर्थ डे पार्टीसाठी भारतात येते. मात्र त्यानंतर असे काही घडते की राजीवचे आयुष्याच बदलून जाते. 'माय बर्थडे सांग' येत्या शुक्रावारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नोराच्या म्हणण्यानुसार तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावणार आहे. नोराला समीर आणि संजयसोबत काम करण्याची संधी सोडायची नव्हती. याआधी नोरा जॉन अब्राहम स्टारर ‘रॉकी हँडसम’मधील रॉक द पार्टी या गाण्यात दिसली होती. नोराने या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते आमि त्यातून तिची निवड करण्यात आली. हा एक सपेंन्स थ्रीलर चित्रपट आहे. चित्रपटात नोरा कॅनडाची राहणारी दाखवण्यात आली आहे. खऱ्या आयुष्यात देखील नोरा कॅडनडात राहणारी भारतीय वंशाची अभिनेत्री आहे. नोराकडे या चित्रपटानंतर अनेक ऑफर्स आहेत मात्र तिचा कल वेबसिरिज करण्याकडे असल्याचे तिने सांगितले आहे. नोरा सोशल मीडियावर देखील खूप एक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती सतत आपले व्हिडिओ शेअर करत असते. नोराच्या डान्सचे आधीच अनेक लोक दिवाने आहेत. अलीकडे नोरा पंजाबी सिंगर हार्डी संधूच्या ‘नाह’ गाण्यात दिसली होती