Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानला भेटायला जोधपूरच्या जेलमध्ये पोहोचली 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 17:27 IST

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान सध्या जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. सलमानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली मात्र त्यावर ...

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान सध्या जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. सलमानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली मात्र त्यावर निकाल सत्र न्यायालयाने राखून ठेवला. आज सकाळी सलमानला भेटायसा प्रिती झिंटा पोहोचली होती. प्रितीने चेहऱ्या लपवण्यासाठी डोक्यावर टोपी घातली होती. जेलमधून बाहेर आल्यावर ती सरळ गाडीत जाऊन बसली आणि हॉटेलच्या दिशेने रवाना झाली. प्रितीने सलमान सोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. चोरी चोरी चुपके चुपके’, ‘जानेमन’, ‘हीरोज’ आणि‘हर दिल जो प्‍यार करेगा’मध्ये प्रितीने सलमानसोबत अभिनय केला आहे. दोघांमध्ये चांगले बाँडिंग असल्याचे अनेक वेळेस निदर्शनास आले आहे. अशा नाजूक वेळेस आपल्या मित्रास हिमत देण्यासाठी प्रिती झिंटा आली होती. सलमानला जोधपूरला भेटण्यासाठी येणारी प्रिती ही पहिलीच सेलिब्रेटी आहे. ऐवढेच नाही तर काल 'बागी2'ची सक्सेस पार्टीसुद्धा साजिद नाडियाडवालाने रद्द केली होती. सलमानच्या समर्थनात बॉलिवू़डचे अनेक सेलिब्रेटी पुढे आले आहे. अनेकांनी काल रात्री जाऊन सलमानच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कालपासून सलमानसोबत त्याच्या दोन्ही बहिणी अलविरा आणि अर्पिता सातत्याने खंबीरपणे उभ्या आहेत. जामिनावरील सुनावणीच्या वेळी देखील त्या हजर होत्या.  गुरुवारी जोधपूरच्या सत्र न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी सलमानला  पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दांडाची शिक्षा सुनावली. कालची रात्र सलमानने तुरुंगातच काढली आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र  आज तरी त्याला कुठलाही दिलासा मिळू शकला नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमानच्या जामिनावरील निर्णय उद्या शनिवारीपर्यंत राखून ठेवला. यासोबतच सलमानला शिक्षेची दुसरी रात्रही तुरूंगातचं काढावी लागणार, हे स्पष्ट झाले.