Join us

‘पद्मावत’वरून या अभिनेत्रीने संजय लीला भन्साळीला सुनावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 15:13 IST

प्रचंड वादग्रस्त ठरत असलेल्या दिग्दर्शक आणि निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटाला आता बॉलिवूडमधून विरोध होताना दिसत ...

प्रचंड वादग्रस्त ठरत असलेल्या दिग्दर्शक आणि निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटाला आता बॉलिवूडमधून विरोध होताना दिसत आहे. होय, एका बॉलिवूड अभिनेत्रीने संजय लीला भन्साळी यांना चक्क पत्र लिहून सुनावले आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने चित्रपटात दाखविण्यात आलेली सतीप्रथा आणि जौहर प्रथेच्या विरोधात आवाज उठविला आहे. स्वराने भन्साळी यांना पत्र लिहून सुनावताना याबाबत विचारणाही केली आहे. स्वराने भन्साळी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘२१व्या शतकातही महिलांच्या अब्रूच्या आजूबाजूलाच सर्व गोष्टी का फिरतात? विधवा, बलात्कारपीडित महिलांना जगण्याचा अधिकार नाही का?’ स्वराच्या या प्रश्नावर भन्साळी यांच्याकडून काय प्रतिक्रिया मिळते हे बघणे आता औत्सुक्याचे आहे. कारण स्वराने चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्याने भन्साळींना एकप्रकारचा घरचा आहेरच मिळाला आहे. दरम्यान, भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ला तीव्र स्वरूपाचा विरोध होऊनदेखील प्रेक्षकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला हा चित्रपट रिलीज होऊ नये म्हणून करणी सेनेने प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर त्याचा परिणाम होईल, असे बोलले जात होते. मात्र ज्या पद्धतीने चित्रपट बॉक्स आॅफिसवर कलेक्शन करीत आहे, त्यावरून प्रेक्षकांवर विरोधाचा फारसा परिणाम झाला नाही, हेच दिसून येते. मात्र आपल्या बोल्ड आणि अप्रतिम अभिनयासाठी ओळखल्या जाणाºया स्वरा भास्करने चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.