Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री तापसी पन्नूच्या 'फिर आई हसीन दिलरुबा'चं पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 18:06 IST

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने 'फिर आई हसीन दिलरुबा'च्या सिक्वेलच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने  'फिर आई हसीन दिलरुबा'च्या सिक्वेलच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. चित्रपट निर्माते आनंद एल. रायने ट्विटरवर शूटिंग सुरू झाल्याची घोषणा केली. सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे.या पोस्टरमधील तापसीच्या सेंशुअल लूकने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. सिनेमाते पोस्टर पाहून कथानकाबाबत काही अंदाज लावता येत नाही. पोस्टरमध्ये तापसी पाठमोरी बसलेली दिसते तिच्यासमोर ताजमहल दिसतेय.  

कलर यलो प्रॉडक्शन, तापसी पन्नू, सह-निर्माता आणि लेखिका कनिका ढिल्लन यांच्यात मनमर्जियां आणि हसीन दिलरुबाच्या उत्कृष्ट यशानंतर हे तिसरे कॉलेब आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या कथा देण्यासाठी ही  त्रिकूट नक्कीच यशस्वी झालेले असुन या त्रिकुटात आता निर्माता भूषण कुमार देखिल शामिल झाले आहेत.

हा चित्रपट कनिका ढिल्लन यांनी लिहिला आणि सह-निर्मित केला आहे आणि जयप्रद देसाई ने दिग्दर्शित केला आहे. आनंद एल राय, हिमांशू शर्मा निर्मित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार यांनी केली आहे. हा चित्रपट कलर यलो प्रोडक्शनचा आहे.

हसीन दिलरुबा हा विनील मॅथ्यू दिग्दर्शित आणि कनिका धिल्लन लिखित २०२१ चा रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. यात तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि हर्षवर्धन राणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फिर आयी हसीन दिलरुबामध्ये तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :तापसी पन्नू