Join us  

होळीचा मुहूर्त साधला! तापसी पन्नूने बॉयफ्रेंडसोबत गुपचुप केलं लग्न? एकाच सेलिब्रिटीला आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 12:52 PM

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली असल्याची चर्चा आहे

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नूने आजवर विविध सिनेमांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तापसी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. तापसी गेल्या १० वर्षांपासून तिचा बॉयफ्रेंड मैथियास बो सोबत रिलेशनशीपमध्ये आहे. पण नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार तापसीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत गुपचुप लग्न उरकल्याचं समजतंय.

NEWS 18 च्या रिपोर्टनुसार, तापसीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत सिक्रेट वेडिंग केली आहे. होळीच्या पुर्वसंध्येला २३ मार्चला तापसी आणि तिचा बॉयफ्रेंड लग्नबंधनात अडकला आहे. उदयपूरला या दोघांनी लग्न केल्याचं समजतंय. तापसी आणि मैथियासच्या लग्नाला दोघांचेही कुटुंबिय आणि जवळचे मित्र-मैत्रिण उपस्थित होते. याशिवाय बॉलिवूडमधील फक्त दिग्दर्शक - निर्माता अनुराग कश्यप या लग्नाला उपस्थित होता. 

अनुराग कश्यप आणि लेखिका कनिका ढिल्लोन या लग्नाला उपस्थित असल्याचं कळतंय. तापसीचा बॉयफ्रेंज मैथियास बो हा बॅडमिंटन खेळाडू असून त्याने ऑलिम्पिक पदकही जिंकलं आहे. तापसीने सुरुवातीपासून तिच्या रिलेशनशीपची कोणतीही वाच्यता बाहेर केली नाही. त्यामुळे तापसीने तिचं लग्नही गुप्त ठेवलंय, अशी चर्चा आहे. अजुन तापसी किंवा तिच्या कुटुंंबियांकडून कोणताही अधिकृत खुलासा झाला नसला तरीही तिच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :तापसी पन्नूउदयपुरअनुराग कश्यपलग्न