या अभिनेत्रीने मारली टायगरला थप्पड, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 15:58 IST
या अभिनेत्रीने मारली टायगरला थप्पड, व्हिडिओ व्हायरलअभिनेता टायगर श्रॉफचा म्युझिक व्हिडिओ ‘बेफिकरा’चा टीजर प्रकाशित झाला आहे. यामध्ये टायगरसोबत दिशा पटानी ही आहे. असं म्हटलं गेलंय की दिशा ही टायगरची कथित गर्लफ्रेंड आहे. या टीजरमध्ये दिशाने टायगरला थप्पड मारताना दाखविण्यात आले आहे. या टीजरला लोकांनी पसंत केले. दोन दिवसात तीन लाखाहून अधिक लोकांनी हा टीजर पाहिला.
या अभिनेत्रीने मारली टायगरला थप्पड, व्हिडिओ व्हायरल
अभिनेता टायगर श्रॉफचा म्युझिक व्हिडिओ ‘बेफिकरा’चा टीजर प्रकाशित झाला आहे. यामध्ये टायगरसोबत दिशा पटानी ही आहे. असं म्हटलं गेलंय की दिशा ही टायगरची कथित गर्लफ्रेंड आहे. या टीजरमध्ये दिशाने टायगरला थप्पड मारताना दाखविण्यात आले आहे. या टीजरला लोकांनी पसंत केले. दोन दिवसात तीन लाखाहून अधिक लोकांनी हा टीजर पाहिला.टायगरने गुरुवारी ट्विटरवर या टीजरची लिंक दिली होती. त्याशिवाय आपला फर्स्ट लूकही प्रसिद्ध केला होता. काही दिवसांपूर्वी टायगर म्हणाला होता, दिशा खूप बिनधास्त आहे. मात्र आम्हा दोघांचे मार्ग वेगळे आहेत. कदाचित, ती माझी प्रेमिका असती! ती अत्यंत सुंदर आहे आणि स्वभावाने चांगली आहे. मी तिच्यापेक्षा खूप वेगळा आहे. मी बिनधास्त नाही. कदाचित, कोणी मला पसंत केले असते!!दिशा ही मॉडेल आहे. महेंद्रसिंह धोनीवर बनविण्यात येणाºया ‘ एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’पासून ती आपल्या चित्रपटाच्या करिअरची सुरुवात करते आहे.