Join us  

GOOD NEWS! समीरा रेड्डी दुस-यांदा होणार आई!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 11:36 AM

होय, अभिनेत्री समीरा रेड्डी दुस-यांदा आई होणार आहे. काल रात्री समीरा लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली.

अभिनेत्री समीरा रेड्डी दुस-यांदा आई होणार आहे. होय, काल रात्री समीरा लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली. यावेळी तिने बेबी बम्पसोबत  कॅमे-याला अनेक पोज दिल्या. प्रेग्नंसीनंतर समीरा पहिल्यांदा पब्लिक इव्हेंटमध्ये दिसली.स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रेग्नंसीच्या वृत्ताला दुजोरा दिला. होय, मी दुस-यांदा आई होणार आहे. मी चार महिन्यांची प्रेग्नंट आहे. २०१९ मध्ये आम्हाला दुसरे बाळ व्हावे, अशी माझी व अक्षयची इच्छा होती. जुलैमध्ये मी बाळाला जन्म देईल. यामुळे मी अनेक प्रोजेक्ट नाकारले, असे समीराने यावेळी सांगितले.

अडीच वर्षांच्या डेटींगनंतर २१ जानेवारी २०१४ रोजी समीराने मराठमोळा उद्योजक आणि ‘वेर्देची’ या सुपरबाईक्स कंपनीचा मालक अक्षय वर्देसोबत लग्न केले होते. समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी घोडीवर नव्हे तर बाईकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता. २५ मे २०१५ रोजी समीराने आपल्या पहिला मुलाला जन्म दिला होता.

समीराने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.समीराचे उद्योगपती विजय माल्यासोबत खास नाते आहे. समीराचे कन्यादान विजय माल्या यानेच केले होते. समीरा माल्याला अंकल संबोधते. माल्याच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमात समीरा दिसली आहे.

टॅग्स :विजय मल्ल्याTollywood