Join us  

‘आर्ची’चा नादच खुळा...! रिंकू राजगुरूने खास अंदाजात चाहत्यांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 3:22 PM

रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) लवकरच नागराज मंजुळे दिग्दर्शित हिंदी चित्रपट झुंडमध्ये काम करताना दिसणार आहे.

सैराट (Sairat Movie) चित्रपटातून रसिकांच्या मनात अल्पावधीत अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिने घर केले. त्यानंतर ती आणखी मराठी चित्रपटात आणि हिंदी वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली. तसेच रिंकू राजगुरू ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. दरम्यान ती यावेळी तिच्या ट्रेडिशनल फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

रिंकूने तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठमोळ्या अंदाजात रिंकून नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपले साडीतले फोटो शेअर करत रिंकूने लिहिले तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. रिंकूचे चाहतेही तिला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतायेत. रिंकूचा मराठामोळा साज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले आहेत. जांभळ्या रंगाच्या साडीत रिंकू खूपच सुंदर दिसतेय.

रिंकू राजगुरूने वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती अनकही कहानियां या वेबसीरिजमध्ये झळकली आहे. तसेच २०० हल्ला होमध्येदेखील ती दिसली. लवकरच ती नागराज मंजुळे दिग्दर्शित हिंदी चित्रपट झुंडमध्ये काम करताना दिसणार आहे. रिंकू छूमंतर या मराठी चित्रपटात झळकणार आहे.या चित्रपटात तिच्यासोबत प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना आणि सुव्रत जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूसैराट 2