मीडिया रिपोर्टनुसार कल्कि यात एक रैपरच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी कल्कि जोया अख्तर च्या जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याशिवाय ऋतिक रोशन, कॅटरिना कैफ, फरहान अख्तर आणि अभय देओल ही होते. आता कल्कि गली बॉयमधून रैपरच्या भूमिकेत किती धमाल करते हे आपल्याला लवकरच कळेल.
रणवीर सिंग आणि आलिया या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. नुकतेच दोघांनी जोयासोबत चित्रपटाचे स्क्रिप्ट रीडिंगचे सेशन देखील केले. याशिवाय रणवीरने या चित्रपटासाठी गाणंसुद्धा रेकॉर्ड केले आहे. गाणं रेकॉर्ड करतानाचे रणवीरचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. या चित्रपटाची शूटिंग पुढच्या आठवड्यापासून मुंबईत सुरु होणार आहे. मुंबईतल्या धारावीतल्या स्लम एरियामध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. अजूनपर्यंत या चित्रपटाची रिलीज डेट अजूनपर्यंत कळली नाही.
दरम्यान रणवीर सिंगचा पद्मावत हा चित्रपट 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट गतवर्षी 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र चित्रपटाला सतत्याने होणाऱ्या विरोधामुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली तर दुसरीकडे आलिया राजी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन प्रोड्यूस करतो आहे. यात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे. ‘राजी’मध्ये आलिया एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचा विवाह पकिस्तानी लष्कर अधिकाºयाशी होतो. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आलिया भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाºयांना देते, असे याचे कथानक आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे.