भूमिकेसाठी मुंंडन करणाºया अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 22:28 IST
डोक्यावरील सर्व केस काढून, पुरुष मुंडन करीत असतात. परंतु, महिला कधीही मुंडन करीत नाहीत. कारण की, सौदर्यांत भर घालण्यासाठी ...
भूमिकेसाठी मुंंडन करणाºया अभिनेत्री
डोक्यावरील सर्व केस काढून, पुरुष मुंडन करीत असतात. परंतु, महिला कधीही मुंडन करीत नाहीत. कारण की, सौदर्यांत भर घालण्यासाठी केस हे खूप आवश्यक आहेत. मात्र, बॉलिवूड मधील पाच अशाआहेत. की, त्यांनी उत्तम भूमिका साकारण्यासाठी मुंडन करुन घेतले होते. त्यांची खास माहिती ही आपल्यासाठी ...तनवी आजमी : तनवी आजमी हिने संजय लीला भंसाळीच्या ‘बाजीराव मस्तानी ’या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. तिने यामध्ये आपली भूमिका ही उत्तमप्रकारे साकारण्यासाठी आपल्या डोक्यावरील सर्व केस काढून टाकले होते. त्यामुळेच ती या भूमिकेला न्याय देऊ शकली. शबाना आजमी : शबाना आजमीला एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळख आहे. तिने सुद्धा एका चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी संपूर्ण मुंडन केले होते. काही वादग्रस्त कारणामुळे चित्रपटाची शुटींगला उशीर झाला. त्यामुळे शबाना हिने हा प्रोजेक्ट सोडून दिला होता. अंतरा माली : अंतरा मालीने ‘एंढ वंस अगेन ’या चित्रपटात भूमिका करण्यासाठी मुंडन केले होते. हा चित्रपट अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये तिची ही भूमिका लक्षवेधक ठरली. नंदिता दास : नंदिता दास हिने सुद्धा शबाना आजमीच्या बरोबर वाटर या चित्रपटासाठी मुंडन केले होते. परंतु, काही कारणामुळे त्या दोघीही या चित्रपटात काम करु शकल्या नाहीत. लीजा रे : शबाना आजमी व नंदिता दास यांच्या नंतर वाटर या चित्रपटासाठी अभिनेत्री लीजा रे हिने भूमिका केली होती. यामध्ये तिला आपले मुंडन करावे लागले. होते. एका विधवेची भूमिका लीजाने साकारली होती. चित्रपटाचे हे दृश्य श्रीलंकेमध्ये चित्रीत करण्यात आले होते.