Join us
Daily Top 2Weekly Top 5

१२७ कोटींचा मालक आहे या मराठी अभिनेत्रीचा पती, जगतेय आलिशान आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 16:09 IST

१० फेब्रुवारी २००५मध्ये दोघांनी लग्न केले. या दोघांचे हे लव्हमॅरेज आहे.

मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरने साऊथ सुपरस्टार महेशबाबूसोबत तिने लग्न केले आहे. लग्नानंतर नम्रता या चंदेरी दुनियेपासून लांब जात तिचे वैवाहिक आयुष्य मस्त एन्जॉय करत आहे. नम्रताला दोन मुले आहेत.  सितारा आणि गौतम असे तिच्या मुलांची नावे आहेत. विशेष म्हणजे या दोघांमध्येही चार वर्षाचे अंतर आहे. नम्रताही महेशबाबूपासून चार वर्ष मोठी आहे. १० फेब्रुवारी २००५मध्ये दोघांनी लग्न केले. या दोघांचे हे लव्हमॅरेज आहे. लग्नानंतर पतीसोबत नम्रता तिच्या आयुष्यात रमली. लग्नानंतर नम्रता हैदराबाद येथे आलिशान आयुष्य जगत आहे. नम्रता शिरोडकरची बहीण शिल्पा शिरोडकरही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

हैदराबादमध्ये महेशबाबूचे  एक नाही दोन नाही तर तब्बल  11 कोटींचे घर आहे.  नम्रतावरच संपूर्ण कुटुंबाची  देखरेख करण्याची जबाबदारी आहे. वयाच्या अवघ्या वयाच्या 4थ्या वर्षी चाईल्ड आर्टीस्ट म्हणून महेशबाबून काम करण्यास सुरुवात केले होती. मोठ्या मेहनतीने महेशबाबूने सिनेसृष्टीत त्याचे स्थान निर्माण केले आहे.  महेश बाबू  आज जवळपास 127 कोटींचा मालक आहे. महेश बाबू टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.एका सिनेमासाठी महेश बाबू  जवळपास 18 ते 20 कोटी रुपये घेतो. महेश बाबूचे स्वत:च पण एक प्रोडक्शन हाऊस आहे ज्यातच्या बॅनर खाली त्याने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.

नम्रताने सलमान आणि ट्वींकल खन्ना यांच्यासह जब प्यार किसीसे होता है सिनेमातून डेब्यू केला होता. बॉलिवूडनंतर नम्रता तेलुगु सिनेमा वामसी मध्येही झळकली. विशेश म्हणजे वामसी सिनेमा महेशबाबूचा हा पहिला सिनेमा होता. दोघांनीही एकत्र या सिनेमात काम केले होते. याच सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.

 

दरम्यान या दोघांमध्ये अधिक मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतरनंतर प्रेमात झाले. या दोघांची जोडीला रसिकांनी भरपूर पसंती दिली. मात्र त्यांनी नेहमीच त्यांचे पाय जमीनीवरच ठेवले. स्टारडमला त्यांनी जास्त मनावर घेतले नाही. नम्रताही मेहशबाबू पेक्षा चार वर्ष मोठी असूनही या दोघांमध्ये कधीच कोणत्या गोष्टींना घेऊन वाद झाले नाहीत. 

टॅग्स :नम्रता शिरोडकरमहेश बाबू